Ajay Devgn: अजय देवगनच्या 'या' सिनेमाचं शूटींग अचानक थांबवलं, सेटवर झाली मोठी दुर्घटना

अजय देवगनच्या सिंघम 3 या सिनेमाची चाहत्यांना फारच उत्सुकता आहे. येत्या 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र कदातिच हा सिनेमा येण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. याचं कारण म्हणजे सिंघम 3 च्या सिनेमाचं शूटींग रद्द करण्यात आलं आहे. सिनेमाच्या सेटवर अजय देवगनला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे रोहित शेट्टीकडून या चित्रपटाचे शूटिंगही रद्द करण्यात आलंय.

Updated: Dec 24, 2023, 12:57 PM IST
Ajay Devgn: अजय देवगनच्या 'या' सिनेमाचं शूटींग अचानक थांबवलं, सेटवर झाली मोठी दुर्घटना title=

Ajay Devgn : अजय देवगनच्या सिंघम 3 या सिनेमाची चाहत्यांना फारच उत्सुकता आहे. येत्या 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र कदातिच हा सिनेमा येण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. याचं कारण म्हणजे सिंघम 3 च्या सिनेमाचं शूटींग रद्द करण्यात आलं आहे. सिनेमाच्या सेटवर अजय देवगनला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे रोहित शेट्टीकडून या चित्रपटाचे शूटिंगही रद्द करण्यात आलंय.

'सिंघम 1' आणि 'सिंघम 2' नंतर आता 'सिंघम 3' रोहित शेट्टी प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अजय देवगन हा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगन आपल्या डॅशिंग स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच सेटवर अजय देवगनला दुखापत झाल्याचं समोर आलंय. 

अजय देवगणच्या डोळ्याला झाली दुखापत :

अजय देवगणला 'सिंघम 3' च्या शूटिंग सेटवर डोळ्याला दुखापत झालीये. या दुखापतीमुळे तो नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेतोय. अजयच्या दुखापतीमुळे सिंघम 3 ची शूटिंग सध्यातरी रद्द करण्यात आलं आहे. आता शूटिंग सुरू झाल्यावर, सिंघम 3 सिनेमाची टीम हैदराबादमध्ये शूटिंग करणार आहे. मुंबईत रद्द केले शूट 2024 मध्ये हैदराबादच्या शूटींगनंतर करण्यात येणार आहे.

अजयशिवाय शूटिंग होणं अशक्य :

दरम्यान या सिनेमाचं शूटींग अजय देवनग शिवाय होणं अशक्य मानलं जातंय. रोहित शेट्टी इतर स्टार्ससोबत शूट करू शकत नाही. याचं कारण म्हणजे चित्रपटातील मुख्य व्यक्ती अजय आहे. त्यामुळे बाकी असलेल्या शूटिंगमध्ये त्याची खूप गरज आहे. इतर स्टार्सनी त्यांचे बहुतांश शूटिंग पूर्ण केले आहे.

'सिंघम ३' ची चाहत्यांना उत्सुकता :

'सिंघम 3'मध्ये देवगणसोबत अक्षय कुमार, करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण (कॅमिओमध्ये), टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि श्वेता तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा एक बहुप्रतिक्षित चित्रपट असून ज्याचे पहिले 2 भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या पोलीस ड्रामामध्ये अजय देवगन बाजीराव सिंघमच्या मुख्य भूमिकेत आहे.