RCBला चिअर्स करण्यासाठी अनुष्का शर्मा पोहोचली; White dressआणि बेबी बम्प

आयपीएल (IPL 2020) चा ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC)(RCB) रॉयल चॅलेंजर्स बंगलौरला ६ विकेटने हरवलं आहे.

Updated: Nov 3, 2020, 07:11 PM IST
RCBला चिअर्स करण्यासाठी अनुष्का शर्मा पोहोचली; White dressआणि बेबी बम्प

मुंबई : आयपीएल (IPL 2020) चा ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC)(RCB) रॉयल चॅलेंजर्स बंगलौरला ६ विकेटने हरवलं आहे. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बंगलोरला पराभवाचा सामना करावा लागला असेल, पण त्यांनी प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. हा सामना पाहण्यासाठी आणि आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी  (Virat Kohli) विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma)स्टेडियममध्ये पोहोचली होती.

या सीझनमध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आरसीबीच्या सर्व सामन्यात चिअर्स करताना दिसली आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही ती स्टेडियमला पोहोचली. अनुष्काने या दरम्यान पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता. या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये तिचा दिसणारा बेबीबंप हा देखील चर्चचा विषय ठरला.

अनुष्का आपल्या लूकमुळे व्हायरल होत आहे, हे पहिल्यांदाच असं होत नाहीय. या सिझनमध्ये अनुष्का मैदानात आपल्या लूकमुळे अनेक वेळा चर्चेत राहिली.

या सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करताना बंगलोरच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट गमावल्या आणि १५२ रन्स केले. यानंतर दिल्लीने ४ विकेट गमावत, धावसंख्या पूर्ण केली. या सामन्यात विराट कोहलीने २४ चेंडूत २९ धावा काढल्या.