आयरा खान आणि बॉयफ्रेंड नपुर लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Updated: Jul 19, 2022, 08:31 PM IST
आयरा खान आणि बॉयफ्रेंड नपुर लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरला डेट करत आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.

आता अलीकडेच आयराने नुपूर शिखरेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पण ती एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये आयरा तिची आजी झीनत हुसैनसोबत दिसत आहे. आमिरच्या मुलीने आजीला तिच्या प्रियकराची भेट घडवून आणली आहे. ज्यानंतर लोकं विचारत आहेत की, दोघं लग्न करणार आहेत का? आता आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूरची आजी झीनत हुसैन यांच्याशी ओळख करून दिली आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आयराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'रँडम फोटो बॉम्ब'. आयरा, नुपूर आणि झीनत या तिघीही हसत हसत पोज देत आहेत आणि फोटो क्लिक करत आहेत. यावर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, 'किती हॅप्पी फोटो आहे.' तर दुसऱ्या एका चाहत्याने विचारलं, 'तुम्ही दोघं लग्न करणार आहात का?'  आयरा दिवाळीच्या निमित्ताने नुपर आणि त्याच्या कुटुंबासोबत सेलिब्रेशनमध्ये सामील होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुपूर शिखर एक फिटनेस ट्रेनर आहे, तो काही दिवसांपासून इरा खानला ट्रेनिंग देत आहे. एका पोस्टमध्ये इराने सांगितलं होतं की, ती नुपूरसोबत आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण घालवत आहे. नुपूर हा इराचे वडील आणि अभिनेता आमिर खान यांचाही फिटनेस ट्रेनर असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाऊन दरम्यान इरा आणि नुपूरने एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केलं. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, स्टारकिडने नुपूरला तिच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी ट्रेनर म्हणून निवडलं आहे.