कॅन्सरग्रस्त इरफानने चाहत्यांसोबत शेअर केली 'ही' गोष्ट!

बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. 

Updated: Aug 14, 2018, 06:26 PM IST
कॅन्सरग्रस्त इरफानने चाहत्यांसोबत शेअर केली 'ही' गोष्ट! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. अलिकडेच इरफान खानने सहावा आणि शेवटचा किमो पूर्ण केल्याची माहिती समोर आली होती. पाचव्या किमो सेशनच्या वेळी इरफानची प्रकृती फारच खालावली होती. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. 

आता इरफान खानबद्दल अजून एक मोठी खबर समोर येत आहे. आपल्या आजारपणामुळे इरफान वेब सिरीज Gormint मधून बाहेर पडला. याबद्दल खुद्द इरफानने सोशल मीडियावर पोस्ट लिहीली. अॅमेझॉन प्राईमच्या बॅनर अंतर्गत या वेब सिरीजची निर्मिती होत होती. 

या सिरीजचे अधिकतर सीन्स शूट झाले होते. इरफानने सांगितले की, या सिरीजमध्ये काम करुन त्याला खूप मज्जा आली. पण मनावर दगड ठेवून सांगतो की, माझ्या प्रकृतीमुळे मी या सिरीजमध्ये काम करु शकणार नाही.