अन् गुरुनाथच्या पायाखालची जमिनच सरकली...

दिवसेंदिवस अधिक रंजक होत जाणारी झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नवनवे सरप्राईजेस पाहायला मिळत आहेत.

Updated: Aug 14, 2018, 05:48 PM IST
अन् गुरुनाथच्या पायाखालची जमिनच सरकली... title=

मुंबई : दिवसेंदिवस अधिक रंजक होत जाणारी झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नवनवे सरप्राईजेस पाहायला मिळत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या गुरु-शनायाची वाईट वेळ सुरु झाली असून त्यांना आता एक जबर धक्का बसणार आहे. कंपनीला नवा बॉस मिळणार आणि त्याला इंप्रेस करुन आपली संकटे दूर करुयात, या विचारात असणाऱ्या गुरु-शनायाला जबरदस्त धक्का बसणार आहे. 

कारण नवी बॉस असणार आहे राधिका सुभेदार. राधिका मसालेने गुरुची कंपनी चक्क ३०० कोटींना खरेदी केली आहे. आता गुरु-शनायाला ती टेबलं पुसायला लावणार यात वाद नाही.

पण या सगळ्याची कल्पना गुरु-शनायाला नाही. पण ऑफिसमध्ये नव्या बॉसला भेटायला आल्यावर तिथे राधिकाला पाहुन गुरु पुन्हा एकदा तिचा अपमान करतो. पण तिच बॉस आहे, हे कळल्यावर मात्र त्याच्या पायाखालची जमिनच सरकते. त्यात सौमित्र, राधिकाचे अभिनंदन करण्यासाठी पोहचतो. आणि मग गुरुची मस्त खिल्ली उडवली जाते. आता पुढे अधिक गंमत येणार असून गुरु-शनायाला राधिका ऑफिसची टेबलं पुसायला लावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. म्हणून नवनव्या सरप्राईजेससाठी पाहत राहा माझ्या नवऱ्याची बायको.