'अंदाज अपना अपना'चा सिक्वेल येणार? 30 वर्षानंतर आमिर-सलमान एकत्र, प्रोडक्शन हाऊसने दिले संकेत

Salman Khan Aamir Khan Andaz Apna Apna : सलमान खान आणि आमिर खान पुन्हा एकदा करणार स्क्रिन शेअर.. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 22, 2024, 05:21 PM IST
'अंदाज अपना अपना'चा सिक्वेल येणार? 30 वर्षानंतर आमिर-सलमान एकत्र, प्रोडक्शन हाऊसने दिले संकेत title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Aamir Khan Andaz Apna Apna : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आमिर खान यांचा 'अंदाज अपना अपना' आजही सगळ्यांचा लक्षात आहे. हा कल्ट सिनेमानं कधी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यानंतर सलमान आणि आमिरनं कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं नाही. असं वाटतं की आता सलमान खान आणि आमिर 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आता ही चर्चा कशामुळे सुरु झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण आमिर खान प्रोडक्शनची पोस्ट आहे. त्यामुळे सलमान आणि आमिर पुन्हा एकत्र असण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

खरंतर आमिर खानच्या प्रोडक्शन हाउसनं सलमान खानचं 14 चं जुनं ट्वीट शोधून त्यावर रिअॅक्ट केलं आहे. सलमाननं 2010 मध्ये आमिरसाठी ट्वीट केलं होतं. 'चित्रपटानंतर मी आमिरला स्वत: ला हात लावू दिला नाही. जर त्यानं स्पर्श केल्यानं मी सोन्याचा झालो तर?' या ट्वीटवर आता 14 वर्षांनंतर आमिर खान प्रोडक्शननं उत्तर देत लिहिलं की 'आम्ही याविषयी खूप विचार करतो.'

सलमान आणि आमिरच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यांच्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील डायलॉग आणि क्लिप्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहतो. त्यातले आयकॉनिक डायलॉग्स हे प्रेक्षकांना आजही तितकंच वेड लावतात. 

दरम्यान, त्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे आणि प्रत्येक सोशल मीडिया युजर हा नव्या चित्रपटांचा विचार करत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ही नव्या चित्रपटाची हिंट आहे का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'दोघं पुन्हा एकदा हा चित्रपट करणार आहेत?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सलमान आणि आमिरनं सोबत येतील यासाठी आम्ही उत्साही आहोत.' दरम्यान, अजून त्या दोघांपैकी कोणीही याबातमीला दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा : KBC 16 : 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकाला ब्रेन ट्यूमर असल्याचं समजताच अमिताभ भावूक! म्हणाले, 'सगळा खर्च...'

त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सलमान खान आता सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर दुसरीकडे आमिर खान हा 'सितारे जमीन पर' या चित्रपटात व्यग्र आहे. त्याशिवाय सलमान लवकरच 'बिग बॉस 18' शूटिंग सुरु करणार आहेत. त्याचा एक म्यूजिक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे आमिरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या रिटायर्मेंटवर वक्तव्य केलं होतं.