याला म्हणतात स्मार्ट निर्णय! अडीच कोटींच्या नफ्यासहीत मनोज बाजपेयीने विकलं मुंबईतलं घर

मनोज बाजपेयीने मुंबईतील मिनर्व्हा येथील आपले आलिशान घर विकले आहे. 2013 मध्ये त्याने पत्नी शबानासोबत हे घर विकत घेतले होते. 11 वर्षानंतर त्याने हे घर विकले आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 22, 2024, 04:19 PM IST
याला म्हणतात स्मार्ट निर्णय! अडीच कोटींच्या नफ्यासहीत मनोज बाजपेयीने विकलं मुंबईतलं घर title=

Manoj Bajpayee : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयीला नुकताच 'गुलमोहर'साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्याने अनेक चित्रपट केले आहेत. त्याचा नुकताच 'भैय्या जी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. अभिनेता मनोज बाजपेयीकडे मुंबईत अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. यामधील एक मालमत्ता त्याने विकल्याची माहिती समोर आली आहे. 

रिपोर्टनुसार, मनोज बाजपेयीने त्याचे आलिशान अपार्टमेंट 9 कोटीला विकले आहे. 2013 मध्ये त्याने पत्नी शबाना बाजपेयीसोबत हे घर विकत घेतले होते. त्यावेळी या अपार्टमेंटची किंमत 6.4 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत त्याने 11 वर्षांनंतर हे घर 9 कोटींना विकून अभिनेत्याने 2.6 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. 

महालक्ष्मी टॉवर

मनोज बाजपेयीचे हे घर मुंबईतील मिनर्व्हा येथील महालक्ष्मी टॉवरमध्ये आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1247 Square फूट आहे. मनोज बाजपेयी सध्या त्याच्या कुटुंबासोबत अंधेरीच्या लोखंडवाला येथे राहतो. गेल्या काही वर्षांपासून तो लोखंडवाला येथे राहत आहे. अभिनेत्याने 2013 मधील महालक्ष्मी टॉवरमधील त्याचे घर हे प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी खरेदी केली असल्याचा अंदाज आहे. 

चाळीमध्ये 10 लोकांसोबत राहत होता मनोज बाजपेयी

एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये डीएन नगरमधील एका चाळीत राहत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर 1994 मध्ये त्याने 'द्रोहकाळ'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी पैशांची कमतरता होती त्यामुळे तो 10 लोकांसह चाळीत राहत होता. त्याच्यासोबत राहणारे त्याचे मित्र देखील त्याच्याप्रमाणेच इंडस्ट्रीत येण्यासाठी धडपडत होते. 

तिग्मांशु धूलिया मनोज बाजपेयीचे रूम पार्टनर

मनोज बाजपेयी ज्या 10 लोकांसोबत चाळीमध्ये राहत होते. त्यामध्ये एक तिग्मांशु धूलिया होते. जे सध्या प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आहेत. 'भैय्या जी' व्यतिरिक्त मनोज बाजपेयी हे नुकतेच OTT वर असलेल्या 'सायलेन्स 2' मध्ये दिसला होता. त्यानंतर आता तो वेब सीरिज 'द फॅमिली मॅन' सीझन 3 मध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.