'मृत्यूशय्येवर असणाऱ्या काँग्रेसला नव्या नामकरणाची गरज'

'रंगदे बसंती' चित्रपटाचा अभिनेता सिद्धार्थने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

Updated: May 23, 2019, 07:16 PM IST
'मृत्यूशय्येवर असणाऱ्या काँग्रेसला नव्या नामकरणाची गरज'

नवी दिल्ली : देशभरातून निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सर्वत्र लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. देशात दुसऱ्यांदा मोदी लाट वाहताना दिसत आहे. ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नारे लावण्यात येत आहेत. भारतातच नाही तर परदेशातही भाजपा समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.  लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अनेक दिग्गज कलाकार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे 'रंगदे बसंती' चित्रपटाचा अभिनेता सिद्धार्थने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

 सिद्धार्थने सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्याने राहुल गाधींना  काँग्रेस पक्षाचे  नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की , 'जे एका असक्षम नेत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. अनेक अडचणी आणि स्वत:च्या नुकसानानंतरही पक्षासोबत आहेत. स्वातंत्र भारताचा हा फार जुना पक्ष आहे जो सध्या मृत्यूशय्येवर आहे. '

क्रिकेट संघात आयपीएल खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स टीम प्रमाणे काँग्रेसने  पक्षाचे नाव बदलण्याचा विचार करावा, असे त्याने सांगितले. त्याचप्रमाणे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.