शाहिदच्या सावत्र वडिलांना पुन्हा पूत्ररत्न

वयाच्या ५२ वर्षी पूत्ररत्न

Updated: Sep 1, 2019, 01:58 PM IST
शाहिदच्या सावत्र वडिलांना पुन्हा पूत्ररत्न

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर थोरला भाऊ झाला आहे. ईशानचे वडील आणि अभिनेता राजेश खट्टर यांची पत्नी वंदना सजनानी यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांना पुन्हा पूत्ररत्न प्राप्त झाले आहे. वंदना जुळ्या मुलांना जन्म देणार होती. परंतू काही वैद्यकीय अडचणींमुळे डॉक्टर एका मुलाला वाचवू शकले नाहीत. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर वंदनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

राजेशने त्याच्या नवजात मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव वनराज कृष्ण असे ठेवले आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतर राजेश - वंदना सजनानी यांना मुलगा झाला आहे.

बॉलिवूडलाईफला दिलेल्या मुलाखतीत राजेश म्हटला की, 'काही महीन्यांपूर्वी आम्हाला कळालं होती की वंदना जुळ्या मुलांना जन्म देणार होती. परंतू अथक प्रयत्नांनंतर देखील आम्हाला एका मुलाला गमवावे लागले.'

राजेश खट्टरचे पहिले लग्न शाहिद कपूरची आई निलीमा अजीम सोबत झाले होते. ईशान खट्टर निलीमा आणि राजेश यांचा मुलगा आहे. 

About the Author