व्यक्ती नव्हे लोकशाहीचा विजय झालाय, कंगनाचे ट्वीट

 कंगनाने यासंदर्भात ट्वीट करत पालिकेला चिमटे काढलेयत. 

Updated: Nov 27, 2020, 12:17 PM IST
व्यक्ती नव्हे लोकशाहीचा विजय झालाय, कंगनाचे ट्वीट  title=

मुंबई : कंगना राणौतच्या घरावर केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टला फटकारलंय. न्यायालयाने पालिकेची नोटीस रद्द ठरवल्याने कंगनाला मोठा दिलासा मिळालाय. यानंतर कंगनाने यासंदर्भात ट्वीट करत पालिकेला चिमटे काढलेयत. 

जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात जिंकते तेव्हा तो विजय तिचा नसतो तर लोकशाहीचा विजय असतो असं कंगनाने म्हटलंय. लढण्याची प्रेरणा देणाऱ्या आणि तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानलेयत. 

अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. कंगनाच्या ऑफीसच्या अनधिकृत भागाची पालिकेकडून तोडफोड करण्यात आली होती.  ही सुडाची कारवाई असल्याचे कंगनाने न्यायालयात म्हटलं होतं. त्यावर न्यायालयाने पालिकेची नोटीस रद्द ठरवली आहे. 

कंगनाने केलेले ट्वीट वादग्रस्त असले तरी तिचं कार्यालय आधीपासून होतं असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तरी कंगनाला परिसरात कोणतंही नवं बांधकाम करायचं असल्यास पालिकेची परवानगी घ्यावी लागेल असंही न्यायालयाने म्हटलंय

कंगना रानावत यांची इमारत पूर्वी पासूनची आहे. नागरिकाने केलेल्या बेजबाबदार टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. कायद्यानुसार  नागरिकांच्या अशा विचारांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करू शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. 

एखाद्या नागरिकाविरूद्ध राज्य भयंकर कारवाई करू शकत नाही, परंतु तिचे मत विवादास्पद आहे असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.