Birthday celebration: जान्हवी कपूरचे Unseen फोटो

जान्हवीने तिच्या वाढदिवसाचा केक आणि सिनेमाच्या सेटवर करण्यात आलेलं सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत.

Updated: Mar 6, 2021, 03:55 PM IST
Birthday celebration: जान्हवी कपूरचे Unseen फोटो

मुंबई : जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे. नव्या टप्प्यावर जान्हवीचा वाढदिवस सिनेमाच्या सेटवर साजरा करण्यात आला आहे. सध्या ती पंजाबमध्ये असून तिच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवीने नुकताच एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे की,  कोविड-१९ मुळे घरी राहिल्यानंतर एक वर्षानंतर सेटवर यावर्षी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा तिला खूप जास्त आनंद झाला आहे. आता तिच्या टीमसह तिच्या वाढदिवसाचे सेट्सवरिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूरने शेअर केला फोटो
जान्हवीने तिच्या वाढदिवसाचा केक आणि सिनेमाच्या सेटवर करण्यात आलेलं सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. सर्वांनी मोठ्या उत्साहानं तिचा हा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. यावेळी जान्हवीही खूप मस्त सेलिब्रेशनचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SheetalfKhan (@sheetal_f_khan)

तिचे हेअर स्टायलिस्ट आणि टीम मेंबरनी देखील त्यांच्या इंन्स्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले आणि त्यातील स्टारला टॅग केले. फोटोंमध्ये जान्हवी तिच्या चित्रपटाच्या सेटवर आपला २४ वा वाढदिवस साजरा करत असताना पांढरे कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसली.

एका फोटोमध्ये जान्हवी केक कट करताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा ऊत्साह दिसत आहे . तिच्या पाठीमागे हा प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी आम्ही हृदयाच्या आकाराचे बलून आणि मोठ्या फुगलेल्या 24 सह पाहू शकतो. दुसऱ्या फोटोत जान्हवीच्या चेहऱ्यावर संपूर्ण वेळ एक वेगळे स्मितहास्य होते.

पिंक व्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारीच जान्हवीचे वडील बोनी आणि बहीण खुशी कपूरसुद्धा तिच्या वाढदिवसाच्या आधी मुंबई सोडून गेले. जान्हवीचा २४ वा वाढदिवस पंजाबमध्ये साजरा करण्यासाठी वडील आणि बहीण येणार असल्याचा चाहत्यांचा अंदाज होता. तिचा 'रोही' हा चित्रपट प्रदर्शनासाठीही तयार आहे. हॉरर-कॉमेडी चित्रपटात राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत स्टार जान्हवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता असून ११ मार्च २०२१ रोजी रीलीज होणार आहे.