Janhvi Kapoor Bold Photo: बॉडी फिटींग वन पीसमधील जान्हवी कपूरचा बोल्ड लूक व्हायरल

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिच्या स्टाइल स्टेटमेंटबरोबरच फॅशन सेन्समुळे ती चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटी 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Updated: Jan 12, 2023, 04:55 PM IST
Janhvi Kapoor Bold Photo: बॉडी फिटींग वन पीसमधील जान्हवी कपूरचा बोल्ड लूक व्हायरल title=
Janhvi Kapoor Bold Photo

Janhvi Kapoor Bold Photos : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बॉलीवूडमध्ये आपला जम बसवण्यासाठी फार मेहनत घेत आहे. अगदी चित्रपटांच्या निवडीपासून ते भूमिकांपर्यंतचे निर्णय ती फारच विचारपूर्णपणे घेताना दिसते. एकीकडे चित्रपटसृष्टीमध्ये चाचपडत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र जान्हवीचा मोठा चाहता वर्ग असून सध्या तिचा एक बोल्ड फोटो (Bold Look) चर्चेत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंन्स्टाग्रामवर जान्हवी कपूरचे 2 कोटी 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा एक बोल्ड फोटो व्हायरल (Viral Photo) होत आहे. या फोटोमध्ये जान्हवीने एक बॉडी फिटींग वन पीस ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. या ड्रेसमध्ये नेहमीप्रमाणे जान्हवी फारच सुंदर दिसत आहे. जान्हवीने परिधान केलेला हा लाल रंगाचा ड्रेस फारच छोटा आहे. 

जान्हवीचा हा फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाल्याचं कमेंट सेक्शन पाहिल्यावर दिसून येतं. मोकळे सोडलेले केस, डॉर्क रेड लिप्सटिक अशा लूकमध्ये जान्हवी फारच बोल्ड दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये जान्हवीचा क्लोज-अप लूक (Close-Up Look) दिसत आहे. जान्हवीच्या मेकअपमुळे तिचा हा लूक अधिकच मोहक दिसत आहे. जान्हवीच्या ज्या बोल्ड लूकची चर्चा आहे तो एकदा पाहाच...

जान्हवी सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केल्याचं पहायला मिळत आहे. जान्हवी ही तिच्या फॅशन सेन्समुळे कायमच तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. लवकरच जान्हवी वरुण धवनबरोबर 'बवाल' चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.