Janhvi Kapoor ने खरेदी केलं स्वतःचं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

दोन सिनेमानंतर खरेदी केलं घर 

Updated: Jan 5, 2021, 11:43 AM IST
Janhvi Kapoor ने खरेदी केलं स्वतःचं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)सध्या गोव्यात आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरने मुंबईत स्वतःची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. २३ वर्षांच्या या जान्हवीने आपलं स्वतःचं हक्काचं (Janvhi Kapoor House) असं घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. 

जान्हवी कपूरच्या घराची किंमत 

जान्हवी (Janhvi Kapoor) च्या नव्या घराची किंमत तब्बल ३९ करोड रुपये आहे. जान्हवी कपूरची ही प्रॉपर्टी डिसेंबर २०२० मध्ये खरेदी केली आहे. स्कायर फीट इंडियाच्या रिपोर्टनुसार, जान्हवीचं नवं घर मुंबईतील अतिशय महागड्या परिसरात झालं आहे. जान्हवीचं घरं मुंबईतील जुहूमध्ये आहे. 

जान्हवीचं हे घर तीन मजल्यांची इमारत आहे. जान्हवीच्या या घराची डिल ही ७ डिसेंबर रोजी फायनल झाली. या घराकरता जान्हवीने तब्बल ७८ लाखाची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. 

एवढ्या लहान वयात खरेदी केलं घर 

जान्हवी कपूरने वयाच्या २३ व्या वर्षी स्वतःचं आलिशान असं घर खरेदी केलं आहे. एवढ्या लहान वयात घर खरेदी केल्यामुळे जान्हवीचं कौतुक होत आहे. जान्हवीने बॉलिवूडमध्ये २०१८ मध्ये 'धडक' सिनेमातून पदार्पण केलं. 

जान्हवीने नुकताच 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' रिलीज झाला आहे. हा सिनेमा खूप चर्चेत होता. लॉकडाऊनमध्ये या सिनेमाला नेटफ्लिक्सवर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. जान्हवी लवकरच "दोस्ताना २" सिनेमात झळकणार आहे.