मुंबई : अभिनेत्री Jasleen Matharu ची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब आहे, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, जसलीनने हॉस्पिटलमधून असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे तिला इंस्टाग्रामवर खूप ट्रोल केलं जात आहे. मात्र काही चाहते तिला पाठिंबाही देत आहेत.
जसलीनची इन्स्टा रील
खरंतर जसलीनने हॉस्पिटलमधून एक इंस्टा रील शेअर केली आहे. या रीलमध्ये, जसलीन सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी स्टारर फिल्म शेरशाह मधील 'राता लंबिया' गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. जसलीनने हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जसलीनने लिहिलं आहे की, 'कारण हे ट्रेंडिंग आहे, आणि हे मी करू शकते हे बेस्ट आहे.'
जसलीन ट्रोल
जसलीनने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती केवळ दुःख व्यक्त करत नव्हती, तर ट्रोल आणि तिच्या तब्येतीचा उल्लेख करत होती. अशा स्थितीत अनेक ट्रोलर्सने अभिनेत्रीची आठवण ठेवून तिला लक्ष्य केले. एका ट्रोलने लिहिले- 'नाटक करणं बंद कर, जशी काय सिद्धार्थ शुक्लाची हिलाच मोठी चिंता, नौटंकी नंबर एक.' तर आणखी एका ट्रोलने लिहिलंय की, 'शॉक ओव्हर ड्रामेबाज.' ट्रोलर्सने अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
चाहते चिंतेत आहेत
एकीकडे जसलीनला ट्रोल केलं जात असताना, दुसरीकडे तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दलही चिंता आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सने जसलीनच्या तब्येतीवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बऱ्याच चाहत्यांनी लिहिलं आहे की, तुम्हाला लवकर बरं होताना आम्हाला पाहायचं आहे. यासोबतच काही चाहत्यांनी जसलीनच्या भावनेला पुढे जाण्यासाठी सलामही केला आहे.
काही दिवसांपूर्वी जसलीनने सिद्धार्थ शुक्लाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये जसलीन म्हणत होती की, 'ज्या दिवशी सिद्धार्थचा मृत्यू झाला आणि मी त्याच्या घरी पोहचले. एक तर मी ती बातमी ऐकल्यानंतर आणि त्याच्या घरातलं ते वातावरण पाहिल्यानंतर ते सगळंच खूप भयानक होतं. जेव्हा मी शहनाजला आणि त्याच्या मम्मीला भेटल्यानंतर माझ्या घरी आले, तेव्हा मी वाचलेला मॅसेज होता की, तुम्हीही मरायला हवे होतात. मला माहित नाही की, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका फरक मला कसा पडला. मला वाटलं की, आयुष्य इतकं अप्रत्याशित आहे. प्रत्येक गोष्ट किती विचित्र आहे. मला काय झालं मला माहित नाही, ज्यानंतर मला स्वतःला रुग्णालयात दाखल करावं लागलं.