Jasmin Bhasin ने कॅमेऱ्यासमोर बदलले कपडे, व्हिडीओ व्हायरल

चाहत्यांसाठी मोठा प्रश्न, जस्मिनने कॅमेरासोबत असं का केलं? 

Updated: Jan 11, 2022, 07:50 PM IST
Jasmin Bhasin ने कॅमेऱ्यासमोर बदलले कपडे, व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : 'बिग बॉस 14' फेम आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. जस्मिनचे फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, याशिवाय अभिनेत्री स्वतःही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

जास्मिन चाहत्यांसाठी काहीतरी ना काही शेअर करत असते जे इंटरनेटवर व्हायरल होत असते. आता अलीकडेच जास्मिनने तिच्या इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर तिचा ड्रेस बदलताना दिसत आहे, पण... पण... पण कथेत थोडा ट्विस्ट आहे.

खरं म्हणजे, जस्मिनने शेअर केलेला व्हिडिओ हा डान्सचा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री तिचा डान्स व्हिडिओ ट्रेंडिंग रीलवर शूट करत आहे. (Jasmin Bhasin ने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे : Watch Video ) 

व्हिडिओमध्ये हे दिसत आहे की सुरुवातीच्या गाण्याच्यावेळी जस्मिनने जांभळ्या रंगाचा लोकरीचा ड्रेस घातला आहे, परंतु जसजसं गाणं पुढे सरकते तसतसे अभिनेत्री तिच्या केसांना फ्लिक करते आणि नंतर तिचा ड्रेस देखील बदलतो आणि नंतर अभिनेत्री गडद निळ्या रंगाचा ड्रेस घालते. 

जस्मिनच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही. एवढंच नव्हे तर तिचा प्रियकर अली गोनीनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अलीने जस्मिनच्या व्हिडिओवर एक हार्ट इमोजी तयार केला आहे, जो अभिनेत्याला जस्मिनचा व्हिडिओ किती आवडला आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. 

अली आणि जस्‍मिन आधीच खूप चांगले मित्र होते, परंतु दोघांची प्रेमकहाणी बिग बॉस 14 पासूनच सुरू झाली आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत.