'तुमचे पूर्वज इंग्रजाचे तळवे चाटत होते, तेव्हा...' कोणावर संतापले जावेद अख्तर?

Javed Akhtar : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या ट्रोलला जोरदार फटकारलंय. जावेद अख्तर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर एक ट्विट केलं अन् नंतर...,

नेहा चौधरी | Updated: Jul 8, 2024, 05:39 PM IST
'तुमचे पूर्वज इंग्रजाचे तळवे चाटत होते, तेव्हा...' कोणावर संतापले जावेद अख्तर? title=
javed akhtar reply to troll called him son of gaddar he say Your forefathers were licking the palms of the British

Javed Akhtar : सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर जावेद अख्तर खुलेपणाने आपले मत कायम मांडत असतात. नुकतेच आगामी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीबद्दल ट्विट केलं त्यानंतर एका ट्रोल्सने त्यांच्यावर शाब्दिक टीका केली. त्यानंतर जावेद अख्तर यांनी ट्रोल्सला जोरदार उत्तर दिलंय. जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया ट्रोल्सला इतिहास आणि राजकारणाबद्दल काही माहिती नसल्याबद्दल फटकारलंय.

पद्मभूषण पुरस्कार विजेते जावेद अख्तर यांनी ट्विट केलं की, 'मला अभिमानास्पद भारतीय नागरिक आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहीन, मात्र जो बिडेन यांच्याबद्दल माझ्या मनात एक समान गोष्ट आहे. 'आम्हा दोघांनाही अमेरिकेचं पुढचं राष्ट्राध्यक्ष होण्याची सारखीच संधी आहे.'

ट्रोलने जावेद अख्तरच्या वडिलांना 'देशद्रोही' संबोधलंय

जावेद अख्तरच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, 'तुझ्या वडिलांनी केवळ मुस्लिमांसाठी राष्ट्र निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, नंतर पुरोगामींच्या वेशात. लेखक, त्यांनी भारतात राहणे पसंत केलं, तुम्ही एका देशद्रोहीचे पुत्र आहात, ज्याने धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली. आता तुम्ही काहीही म्हणा पण हे सत्य आहे.'

ट्रोलच्या या ट्विटवर जावेद अख्तर यांनी ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिलंय. या ट्रोलला उत्तर देताना त्यांनी लिहिलंय की, 'तुम्ही पूर्णपणे अज्ञानी आहात की पूर्णपणे मूर्ख आहात हे ठरवणे कठीण आहे. माझे कुटुंब 1857 पासून स्वातंत्र्य चळवळीत सामील आहे. तुम्ही तुरुंगात आणि काळ्या पाण्यात गेला आहात, जेव्हा तुमचे पूर्वज ब्रिटिश सरकारचे जोडे चाटत होते.'

जेव्हा त्यांना कोणीतरी मिशेल ओबामा यांच्या संभाव्यतेबद्दल विचारलं, तेव्हा जावेद अख्तर म्हणाले, 'मी याआधीही अनेकवेळा माझे मत व्यक्त केलंय आणि मी आजही त्यावर ठाम आहे. अमेरिकेला ट्रम्पपासून कोण वाचवू शकेल ती म्हणजे मिशेल ओबामा.' मात्र, एका युजरने यावर वर्णद्वेषी टिप्पणी करत म्हटलं, 'तुला 'तिच्या' मिशेलवर इतकं प्रेम आहे? या अपमानास्पद पोस्टला उत्तर देताना जावेदने लिहिलंय की, 'तुझ्या कुटुंबाची ही अत्यंत बेजबाबदार गोष्ट आहे की त्यांनी अद्याप तुला मानसिक आश्रयस्थानात पाठवले नाही.' 'यार, तू आजारी आहेस आणि तुला मदतीची नितांत गरज आहे.' अशा प्रकारे जावत अख्तर यांनी ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिलंय.