जवान सुपरहिट की सुपरफ्लॉप? कमाईचे आकडे समोर, 43 व्या दिवशी केली इतकी कमाई

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४३ दिवस झाले आहेत

Updated: Oct 19, 2023, 06:37 PM IST
जवान सुपरहिट की सुपरफ्लॉप? कमाईचे आकडे समोर, 43 व्या दिवशी केली इतकी कमाई title=

Jawan Box Office Collection Day 43 : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४३ दिवस झाले आहेत आणि आता बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. सुपरस्टार विजय थलपथीचा 'लिओ' हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून यामुळे 'जवान'च्या कलेक्शनवर मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे.

'लियो' रिलीज झाल्यानंतर 'जवान'च्या कमाईत मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 'जवान' बॉक्स ऑफिसवर सपाटून खाली पडत होता आणि आता गुरुवारी या चित्रपटाने आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केलं आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 43 व्या दिवशी 0.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाचं एकूण कलेक्शन 638.47 कोटी रुपये इतकं आहे.

'जवान'चा डे-वाइज कलेक्शन
Day 1- 75 करोड
Day 2- 53.23 करोड
Day 3- 77.83 करोड
Day 4- 80.1करोड
Day 5- 32.92 करोड
Day 6- 26 करोड
Day 7- 23.2 करोड
Day 8- 21.6 करोड
Day 9- 19.1 करोड
Day 10- 31.8 करोड
Day 11- 36.85 करोड
Day 12- 16.25 करोड
Day 13- 14.4 करोड
Day 14- 9.6 करोड
Day 15- 8.1 करोड
Day 16- 7.6 करोड
Day 17- 12.25 करोड
Day 18- 14.95 करोड
Day 19- 5.4 करोड
Day 20- 5.00 करोड
Day 21- 4.85 करोड
Day 22- 5.97 करोड
Day 23- 5.05 करोड
Day 24- 8.5 करोड
Day 25- 9.37 करोड
Day 26- 6.85 करोड
Day 27- 2.23 करोड
Day 28- 1.86 करोड
Day 29- 1.85 करोड
Day 30- 1.3 करोड
Day 31- 2.33 करोड
Day 32- 3.00 करोड
Day 33- 0.88 करोड
Day 34- 0.82 करोड
Day 35- 0.79 करोड
Day 36- 0.77 करोड
Day 37- 4.79 करोड
Day 38- 1.71 करोड
Day 39- 2.13 करोड
Day 40- 0.77 करोड
Day 41- 0.82 करोड
Day 42- 0.67  करोड
Day 43- 0.50 करोड

एकूण कलेक्श 638.47 करोड

'लिओ' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी फिरवली 'जवान'कडे पाठ
प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून विजय थलापती यांच्या 'लिओ' या चित्रपटाची वाट पाहत होते. अशा परिस्थितीत या चित्रपटाने प्रि बुकिंगमध्ये उत्तम कलेक्शन केलं असतानाच, शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'जवान' प्रदर्शित होताच या चित्रपटाने धुळीस मिळवला आहे. आता 'जवान' लवकरच मोठ्या पडद्यावरुन हटू शकतो. तर लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचं दिसत आहे.