लग्नानंतर पतीकडून मारहाण, पोलीस केस, दोन वर्षात घटस्फोट अन्...; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

Marathi Actress got Divorced :  या मराठी अभिनेत्रीनं 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. तर तिचं लग्न 2018 मध्ये झालं आणि त्यानंतर अवघ्या 2 वर्षात ती पतीपासून विभक्त झाली होती. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 19, 2023, 06:36 PM IST
लग्नानंतर पतीकडून मारहाण, पोलीस केस, दोन वर्षात घटस्फोट अन्...; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? title=
(Photo Credit : Social Media)

Marathi Actress got Divorced: हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्नेहा चव्हाण. स्नेहा चव्हाणनं अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यासोबत लग्न केले होते. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही इतर कलाकारांप्रमाणेच सुरु झाली होती. तर ती कशी असा प्रश्न पडला असेल तर त्या दोघांची पहिली भेट ही 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटाच्या वेळी झाली होती. सेटवर झालेली मैत्री आणि त्यानंतर अनेक गोष्टी हळूहळू घडत गेल्या. त्याची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया...

जेव्हा त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याच काळात स्नेहाच्या घरी तिच्या लग्नासाठी चांगल्या वराची शोध सुरु झाली होती. अशात सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे, अनिकेतची मावशी आणि स्नेहाची आई या दोघी एकाच बिल्डिंगमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्या दोघींची चांगली मैत्री होती. जेव्हा अनिकेतच्या मावशीला कळाले की स्नेहाच्या घरीचे तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत आहे. तेव्हा त्यांनी त्यांनी अनिकेतच्या घरी स्नेहाचं स्थळ सुचवलं. स्नेहाच्या घरी तर अनिकेत हा पसंत होता. मग स्नेहा आणि अनिकेतनं एकमेकांशी चर्चा केली आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. अनिकेतनं याविषयी एका मुलाखतीत सांगितलं की 'अनोळखी मुलीशी लग्न करण्यापेक्षा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला’. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नाच्या दोन वर्षात झाला घटस्फोट

'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र, अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये स्नेहानं घरगुती हिंसाचार प्रकरणी अनिकेत आणि त्याच्या कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. स्नेहानं तक्रार दाखल करताच अनिकेतनं म्हटलं होतं की स्नेहानं हे फक्त पोटगी मिळवण्यासाठी केलं होतं. 2021 मध्ये सुरु झालेल्या या प्रकरणाचा 2023 मध्ये निकाल लागला. त्या दोघांच्या घटस्फोटाला कोर्टानं मान्यता दिली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : सलमान खान आणि अरिजीतमधील वादाला अखेर पूर्णविराम! भाईजानने केली खास पोस्ट शेअर

स्नेहाचा नवा लूक चर्चेत

घटस्फोटानंतर स्नेहा ही तिच्या कुटुंबासोबत राहत आहे. त्यानंतर स्नेहानं तिचा संपूर्ण लूक बदलला, तिनं तिचे लांब केस कापून शॉर्ट हेअर केले आहेत. तिचा हा लूक चांगलाच चर्चेत होता.