VIDEO : चाहत्यांवर भडकल्या जया बच्चन

जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतात. 

Updated: Mar 19, 2019, 11:04 AM IST
VIDEO : चाहत्यांवर भडकल्या जया बच्चन  title=

मुंबई : जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतात. त्यांना त्यांच्या परवानगी शिवाय फोटो काढलेले अजिबात आवडत नाही. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या खूपच भडकलेल्या दिसत आहेत. एका चाहत्याने त्याच्या फोन मध्ये जया बच्चन यांना न विचारता फोटो काढल्याने त्यांनी चाहत्याला चांगलेच खडसावल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. व्हायरल भयानी नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#jayabachchan at #hiroojohar birthday lunch @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोमवारी जया बच्चन दिग्दर्शक करण जोहरच्या आईच्या वाढदिवसासाठी उपस्थित होत्या. करण जोहरची आई हीरू जोहर यांचा ७६वा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात एका हॉटेल मध्ये साजरा करण्यात आला. वाढदिवस करून जया बाहेर हॉटेलच्या पडल्या तेव्हा चाहत्याने फोटो काढला. त्यानंतर त्यांनी चाहत्याला काहीतरी शिका असे सांगितले. पुन्हा तोच प्रकार घडल्याने त्यांनी चाहत्यांना असे करू नका असे सांगितले. घडल्या प्रकारावरून जया बच्चन यांनी चाहत्यांचा हिरमोड केल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी बच्चन भावंडे दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या चॉट शोमध्ये उपस्थित होते. तेव्हा त्यांनी आपल्या आई बद्दल एक खुलासा केला. जया यांना कॅमेऱ्याच्या लाईट मुळे खूप त्रास होतो. त्याचप्रमाणे त्यांना जास्त गर्दीचे स्थळेही आवडत नसल्याचे त्यांनी सांगितले.