सौंदर्यवती जया प्रदा यांचा लूक पाहून चाहते हैराण, म्हणाले 'ये क्या हुआ कैसे हुआ?'

सौंदर्यवती जया प्रदा यांचा लूक पाहून चाहते हैराण, म्हणाले 'क्या से क्या हो गया?'

Updated: Aug 4, 2022, 05:14 PM IST
सौंदर्यवती जया प्रदा यांचा लूक पाहून चाहते हैराण, म्हणाले 'ये क्या हुआ कैसे हुआ?' title=

VIRAL PHOTOS OF JAYA PRADA : जया प्रदा म्हणजे बॉलीवूडमधील सुपरस्टार्सपैकी एक सौन्दर्यवती.. एक काळ होता त्यांचं दिसणं,अभिनय,नृत्य सगळ्यांची क्रेझ होती त्यांचे लाखो चाहते होते जया प्रदा यांनी अनेक सिनेमे केले आहेत त्यातील बरेच सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत ज्यात 'सरगम', 'मां', 'घर घर की कहानी', 'तूफान', 'स्वर्ग से सुंदर', 'संजोग', 'मुद्दत', 'सिंदूर', 'जबरदस्त', 'जख्मी', 'गंगा तेरे देश में', 'कामचोर', 'आवाज', 'पाताल भैरवी', 'सपनों का मंदिर' या सिनेमांची नाव आवर्जून घ्यावी लागतील जया प्रदा यांनी आपल्या अभिनयाने आणि सौन्दर्याने  सर्वांची मन जिंकली . 
नुकतीच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत ज्यात त्यांचा लुक एकदम बदलून गेलाय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial)

नुकतचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर जया प्रदा ऍक्टिव्ह असतात त्या स्वतःचे काही फोटो अपलोड करत असतात  त्यांनी कधी साडीवरचा फोटो अपलोड केलाय तर कधी गाऊन घातलेला सुंदर फोटो तर कधी रिऍलिटी शो दरम्यानचा फोटो अपलोड केलाय..जया प्रदा यांचे हे फोटोस सध्या खूप चर्चेत आहेत..त्यांच्या फोटोसवर फॅन्सकडून जोरदार कमेंट्स येऊ लागल्या आहेत.

फॅन्सना त्यांचा हा अंदाज खूप आवडू लागला आहे या वयातही जया प्रदा आणखी सुंदर दिसू लागल्या आहेत .या वयात ही सुंदरता कशी टिकवून ठेवलीये  याच सर्वानाच आश्चर्य वाटत आहे .