Video: आईच्या कुशीत! करीनापासून प्रियंकापर्यंत आपल्या तान्ह्या बाळाला सेलिब्रेटी मॉम्स अशा झोपवतात...

बॉलिवूडमध्ये जॉनी लिव्हर यांचे नाव मोठ्या आणि दिग्गज कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांची दोन्ही मुलंही अभिनयक्षेत्रात आले आहेत. त्यांची मुलगी जिमी लिव्हर आपल्या विनोदशैलीनं सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. 

Updated: Jan 26, 2023, 07:15 PM IST
Video: आईच्या कुशीत! करीनापासून प्रियंकापर्यंत आपल्या तान्ह्या बाळाला सेलिब्रेटी मॉम्स अशा झोपवतात...  title=

How Celebs Moms Make Thier Baby Nap: लहान मुलांना शांत झोपण्यासाठी अनेक ट्रीक्स आजमाव्या लागतात. लहान मुलं कधी रडतील याचा काहीचं थांगपत्ता नसतो आणि त्यामुळे अनेकदा पालकांच्याही नाकी नऊ येतात. परंतु तुन्हाला असाही प्रश्न पडला असेल की नक्की सेलिब्रेटी मॉम्स (Jemmie Lever Viral Video) आपल्या मुलांना नक्की कसं झोपवत असतील? हो, असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु याचे उत्तरही तुम्हाला लगेचच मिळेल. सध्या अनेक सेलिब्रेटी कपल्सच्या घरी पाळणा हलू लागला आहे त्यातून आपलं काम आणि घरसंसार यामध्ये ही सेलिब्रेटी व्यस्त असतात. तेव्हा नक्की हे सेलिब्रेटी आपल्या लहान मुलांना रात्री कसं काय झोपवतं असतील? सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यातून तुम्हाला त्याचे उत्तर हटके अंदाजातून मिळू शकते. (jemmie lever funny video on how celebrity mom make their children asleep kareena kapoor priyanka chopra)

बॉलिवूडमध्ये जॉनी लिव्हर (Jonny Lever) यांचे नाव मोठ्या आणि दिग्गज कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांची दोन्ही मुलंही अभिनयक्षेत्रात आले आहेत. त्यांची मुलगी जिमी लिव्हर आपल्या विनोदशैलीनं सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिचे व्हिडीओजही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ लोकांनी तूफान लाईक्स, शेअर आणि कमेंट्स केले आहेत. या व्हिडीओमध्ये जिमी लिव्हरनं प्रियंका चोप्रा )Priyanka Chopra Daughter) ते करीना कपूरपर्यंतच्या (Celebs Moms) सेलिब्रेटी मॉम्स आपल्या लहान मुलांना कश्या झोपवतं असतील याचा गमतीशीर व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच हशा पिकला आहे. या व्हिडीओत जिमीनं करीना कपूरच्या कभी खुशी कभी गममधल्या पू च्या भुमिकेची कॉपी करत व्हिडीओ शेअर केला आहे. करीना कपूर (Kareena Kapoor) तैमुरला कशी झोपवते?, तेव्हा ती तैमूरला (Taimur Ali Khan) काय सांगत असेल याचं उत्तम उदाहरणं तिनं गमतीदार पद्धतीनं शेअर केलं आहे. यात ती म्हणते, आता लवकर झोप कारण उद्या पेप्स (फोटोग्राफर्स) येतील. यात तिनं करीना कपूरचं नाही तर सोनम कपूर आणि प्रियंका चोप्राचीही नक्कल केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या या व्हिडीओला बॉलिवूड सेलिब्रेेटींसहा अनेकांनी लाईक केले आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 6 लाख व्ह्यूज आले आहेत. या व्हिडीओतून तिनं फरहान खानचीही मिमीकरी केली आहे. त्याचसोबत हा व्हिडीओ बॉलिवूडकरांनाही तूफान आवडला आहे आणि खुद्द रविना तंडनही या व्हिडीओवर कमेंट (Viral Video) पोस्ट केली आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.