'मिस्टर इंंडिया'तून नव्हे तर 'सैराट'च्या रिमेकमधून जान्हवी कपूर करणार डेब्यू

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवायला सज्ज झाली आहे.

Updated: Nov 5, 2017, 03:49 PM IST
'मिस्टर इंंडिया'तून नव्हे तर 'सैराट'च्या रिमेकमधून जान्हवी कपूर करणार डेब्यू  title=

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवायला सज्ज झाली आहे.

२०१६ सालची मराठी सिनेसृष्टीची ब्लॉकबस्टर फिल्म 'सैराट'चा रिमेक हिंदीमध्ये होत आहे. यापूर्वी जान्हवी 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार होती. मात्र आता त्याआधी 'सैराट' चा रिमेक रसिकांच्या भेटीला येणार आहे. 
 
 बॉलिवूडलाईफ़.कॉम च्या माहितीनुसार जान्हवी कपूर 'सैराट'च्या रिमेकमध्ये प्रमुख भूमिकेत झळणार आहे. डिसएंबर २०१७ मध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जून किंवा जुलै महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. 
 
 सैराट बनवण्यासाठी सुमारे ४ कोटींचा खर्च आला होता. मात्र बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार्‍या या चित्रपटाने सुमारे ११० कोटींची कमाई केलीहोती. आता या ब्लॉकबस्टर सिनेमाचे राईट्स करण जोहरने नागराज मंजुळेकडून विकत घेतले आहेत. 
 
 करण जोहर हिंदीमध्ये 'सैराट'चा रिमेक करत असला तरीही तो चित्रपट सारखा नसेल. हिंदी चित्रपटाच्या रसिकांच्या आवडीनिवडीनुसार त्यामध्ये बदल केले जातील. त्यामुळे करण जोहरच्या नजरेतून 'सैराट" कसा दिसतोय हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे. जाह्नवी कपूर आणि  ईशान खट्टर ही जोडी सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहेत.