अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

फोटो पाहून होतंय काळजाचं पाणी...   

Updated: Jul 7, 2022, 11:21 AM IST
अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल होतो हे शब्दांतही मांडता येत नाही. नुकताच एका अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेल्या अशाच अत्याचारांना वाचा फोडली आणि तिचं दु:ख पाहताना अनेकांचेच डोळे पाणावले. 

घरगुती हिंसेचे प्रकार जगभरात पाहायला मिळतात आणि माणूस किती क्रूर होऊ शकते हेसुद्धा सांगून जातात. या अभिनेत्रीसोबतही असंच घडलं. हे फोटो नवे नाहीत. पण, अभिनेत्रीनं सहन केलेला प्रत्येक क्षण किती कठीण होता याची प्रचिती मात्र सातत्यानं देत आहेत. 

ही अभिनेत्री आहे, judith chemla. आपल्या Ex Partner कडून ही मारहाण करण्यात आल्याचं तिनं सांगितलं. पण, त्याचं नाव मात्र उघड केलं नाही. तिच्या चेहऱ्याचे फोटो पाहताना जखमांचा अंदाज येत आहे. (Judith Chemla actress beatan by partner brutaly)

रक्त, जखमा, सूज तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहेत. फ्रेंच भाषेमध्येच तिनं हे फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा केला. 

माझ्याकडे असे कैक पुरावे आहेत, जिथं त्यानं मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचं अगदी स्पष्ट दिसत आहे. तिसऱ्यांना मी पोलिसांत जावं का? तिसऱ्यांदा मी तक्रार दाखल करावी का?, असे थेट सवाल तिनं या पोस्टमधून केले. 

चित्रपट वर्तुळाचा भाग असताना आठ महिन्यांपर्यंत धोक्याची तलवार डोक्यावर टांगती असणं पुरेसं नव्हतं का? असं लिहित तिनं नशिबालाही दोष दिला. या अभिनेत्रीच्या पोस्टनं सर्वांनाच हैराण केलं. तिला न्याय मिळावा यासाठी अनेकांनीच आवाज उठवला.