Jurassic World : Fallen Kingdom चा जबरदस्त ट्रेलर

2018 मधील सर्वात आतुरतेने वाट पाहिला जाणारा सिनेमा ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच याची जोरदार चर्चा रंगली. हा सिनेमा जे ए बायोना यांनी दिग्दर्शित केला असून हा सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकब्लस्टर हीट ठरलेल्या 'ज्युरासिक वर्ल्ड'चा सिक्वल आहे. 

Jurassic World : Fallen Kingdom चा जबरदस्त ट्रेलर  title=

मुंबई : 2018 मधील सर्वात आतुरतेने वाट पाहिला जाणारा सिनेमा ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच याची जोरदार चर्चा रंगली. हा सिनेमा जे ए बायोना यांनी दिग्दर्शित केला असून हा सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकब्लस्टर हीट ठरलेल्या 'ज्युरासिक वर्ल्ड'चा सिक्वल आहे. 

ज्युरासिक वर्ल्ड या सिनेमाने ट्विटर हँडलवर याचा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज केला आहे. तसेच यू ट्यूबवर देखील हा व्हिडिओ रिलीज झाला आहे. ज्युरासिक वर्ल्ड याचा पोस्टर देखील सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. याला मिळणाऱ्या पसंतीला अंदाज आपण लावू शकतो. 

ज्युरासिक पार्कच्या सिक्वेलचं नाव 'ज्युरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’असे आहे. या चित्रपटामध्ये डायनॉसोर आणि त्यांच्या विश्वामध्ये अडकलेली काही लोकं हा संघर्ष दाखवण्यात आला आहे.'पळायला तयार रहा..' असा संदेश या चित्रपटाच्या टीजरमध्ये देण्यात आला आहे. ८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला येणार आहे.