मुंबई : मॉडेल मिलिंद सोमण त्याची २५ वर्षांनी लहान असणारी गर्लफ्रेंड अंकिता कंवर हिच्या सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. मात्र, मिलिंद आणि अंकिताचं ब्रेकअप झाल्याचे वृत्त धडकले होते. मात्र, आमचे काही सुरळीत चालले आहे, असे खुद्द अंकिताना म्हटलेय. त्यामुळे ही ब्रेकअपची अफवा होती, हे स्पष्ट झालेय. २७ वर्षांच्या अंकितासोबत अफेअर असल्यामुळे ५२ वर्षांच्या मिलिंद सोमणला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आले होते. हे दोघं लवकरच लग्न करतील, असंही बोलले जात आहे.
दरम्यान, मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार अंकिता सध्या लग्न करु इच्छित नाही. पण मिलिंदला मात्र लग्न करायचं होतं. या कारणामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाला आहे. तर दुसरीकडे अंकिताला लॉटरी लागल्यामुळे तिनं मिलिंदला सोडल्याच्याही चर्चा आहेत. अंकिता फोनवर ऑनलाईन कसीनो खेळायची. यामध्ये अंकिता ८ लाख ७३ हजार रुपये जिंकली आणि आता अंकिताला मिलिंदची गरज नसल्याचा दावाही केला जात होता. याआधी अंकिता फ्लाईट अटेंडंट होती. तिला २६ हजार रुपये पगार होता. मी वयानं अजून लहान आहे. माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी पटापट घडत आहेत. मला स्वातंत्र्य हवं आहे. जिंकलेल्या पैशांनी मला कुटुंबाला मदत करायची आहे. एवढ्या लवकर मला लग्न करायचं नाही. मिलिंद आणि माझ्या मित्रांना हे समजेल, असे अंकिता एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती.
ब्रेकअप झाल्याचे चर्चा सुरु होतात, अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे स्पष्ट केलेय. प्रेमामध्य संवाद, समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर ते नाते अधिक भक्कम होते असा संदेश लिहिला आहे. तसेच तिने तिचा आणि मिलिंदचा एक रोमॅटिक फोटो पोस्ट केलाय. मिलिंद आणि अंकिताचे लग्न काही दिवसांवर आलेले असताना दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा दिवसभर सुरु होती. त्यामुळे स्वत:हा अंकिताने असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्ट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
रिपोर्टनुसार अंकिता आणि मिलिंद २१ एप्रिलला लग्न करणार होते. हे दोघं दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.