मुंबई : कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ती कायम अनेक मुद्द्यांवर आपलं वक्तव्य मांडते. मात्र आता कंगनाची ट्विटरवरील टिव-टिव बंद होणार आहे. त्यामुळे ती आता कोणत्या माध्यमाचा वापर करत तिचं मत मांडेल असा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. तर यापुढे कंगना ट्विटरला राम राम करत Koo ऍपच्या माध्यमातून तिचे विचार शेअर करणार आहे.
दरम्यान, कंगनाने ट्विटर सोडण्याची धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यात Twitter आणि भारत सरकारमध्ये काही मतभेद निर्माण झाले. केंद्र सरकारने ज्या 1,178 अकाउंट्सचा पाकिस्तान आणि खलिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला होता त्यांना ट्विटरकडून ब्लॉक करण्यात आलं आहे.
Your time is up @Twitter time to shift to kooapp will inform everyone soon about my account details there.
Absolutely thrilled to experience home grown #kooapp https://t.co/Kdm0TISCmR— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 10, 2021
यावर ट्विटरच्या सीईओने प्रतिक्रिया दिली आहे. 'भारताच्या कायद्यांबाबत अनुरूप नाही' असं ते म्हणाले आहेत. त्यानंतर अनेक बड्या सेलिब्रिटींनी ट्विटर ऍपला बायबाय करून भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म KOO ऍपचा वापर करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. कंगनाने देखील ट्विटर सोडण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं.
कंगना ट्विट करत म्हणली, 'तुम्हाला कोणी बनवलं आहे चिफ जस्टिस? तुम्ही लोकांसोबत उभे राहता, नंतर त्यांना मागे खेचता. तर अनेकदा निवडूण न आलेले खासदार होता. एवढचं नाही तर तुम्ही स्वतःला पंतप्रधान समजता. तु्म्ही आहात तरी कोण?'
शिवाय आता ट्विटरची वेळ आता संपली आहे. असं देखील ती म्हणाली. याआधी देखील अनेकदा ट्विटरकडून नोटीसा देखील आल्या होत्या. त्याचप्रमाणे तिची बहिण रंगोली चंदेलचं ट्विटर आकाउंट देखील काही दिवसांसठी सस्पेंड केलं होतं.