नोटाबंदीचं समर्थन केल्याने कमल हसन यांनी मागितली माफी

आधी नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देणारे अभिनेते कमल हसन यांनी आता आपले शब्द परत घेतले आहेत. या निर्णयाला समर्थन दिल्याने त्यांनी आता हा माफी मागितली आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय चुकीचा होता हे मान्य केल्यास ते त्यांना दोनदा सल्यूट करतील, असेही ते म्हणाले आहेत. 

Updated: Oct 19, 2017, 09:33 AM IST
नोटाबंदीचं समर्थन केल्याने कमल हसन यांनी मागितली माफी title=

चेन्नई : आधी नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देणारे अभिनेते कमल हसन यांनी आता आपले शब्द परत घेतले आहेत. या निर्णयाला समर्थन दिल्याने त्यांनी आता हा माफी मागितली आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय चुकीचा होता हे मान्य केल्यास ते त्यांना दोनदा सल्यूट करतील, असेही ते म्हणाले आहेत. 

एका तमिळ वृत्तपत्रात त्यांनी लिहिलेल्या लेखात अभिनेते कमल हसन म्हणाले की, चुकी सुधारणे आणि मान्य करणे मोठ्या नेत्यांचे लक्षण आहे. महात्मा गांधी याबाबतीत सक्षम होते. हसन म्हणाले की, मोदींनी या गोष्टीसाठी हट्ट नको करायला की, त्यांनी जो उंदीर पकडलाय तो तीन पायांचा आहे. नोटाबंदीच्या समर्थात कमल हसन आधी म्हणाले होते की, पक्षाच्या पुढे जाऊन या निर्णयाचं समर्थन केलं गेलं पाहिजे’. त्यांनी आता लेखात लिहिलंय की, ‘तेव्हा मला असे वाटत होते की, काळधन नष्ट करण्याच्या या मोहिमेत लोकांना अडचणी येत असतील त्यांनी थोडं सहन करायला पाहिजे’.

कमल हसन म्हणाले की, त्यांच्या काही मित्रांनी आणि अर्थव्यवस्था महिती असणा-य काहींनी त्यांच्या नोटाबंदीच्या समर्थनावर टीका केली होती. पण नंतर त्यांना वाटलं की, ही ज्याप्रकारे लागू केली ते चुकीचं होतं. आता असे बोलले जात आहे की नोटाबंदी धोका होता.