'हिंदूंमध्येही दहशतवाद पसरलाय'

दिग्गज अभिनेता कमल हसन लवकरच त्याचा स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. 

Updated: Nov 2, 2017, 06:58 PM IST
'हिंदूंमध्येही दहशतवाद पसरलाय' title=

चेन्नई : दिग्गज अभिनेता कमल हसन लवकरच त्याचा स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. या चर्चा सुरु असतानाच कमल हसननं हिंदूंबाबत वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला आहे.

याआधी उजव्या विचारसरणीचे लोक हिंसाचार न करता विरोधकांशी चर्चा आणि वाद करायचे पण आता ते हिंसाचार करतात. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांमध्ये हिंदू नसतात असा दावा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी करू नये कारण हिंदू दहशतवाद पसरला आहे, असं वक्तव्य कमल हसननं त्याच्या लेखामध्ये केलं आहे. हिंदूंचा 'सत्यमेव जयते' वरचा विश्वास उडत चालला असून शक्ती आणि पराक्रमच योग्य असल्याची भावना निर्माण झाली आहे, असं कमल हसन म्हणालाय.

वाढदिवसाला म्हणजेच ७ नोव्हेंबरला मी मोठी घोषणा करीन असं कमल हसन म्हणाला होता. या दिवशी तो राजकीय पक्षाची घोषणा करेल असं बोललं जात होतं, पण नंतर त्यानं ७ नोव्हेंबरला पक्ष काढणार नसल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी कमल हसननं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तसंच केरळचे मुख्यमंत्री पिन्नराई विजयन यांनाही कमल हसन भेटला होता.