कंगनाने आयुष्मान खुरानाला लगावले खडेबोल ; म्हणाली....

ट्विट करत कंगनाचे नवे आरोप 

Updated: Aug 10, 2020, 09:44 AM IST
कंगनाने आयुष्मान खुरानाला लगावले खडेबोल ; म्हणाली....

मुंबई : कंगना कायमच आपल्या बोलण्यामुळे ओळखली जाते. आता कंगनाने आयुष्मान खुरानाला खडे बोल लगावले आहेत. कंगना या काळात त्या प्रत्येक कलाकाराला, दिग्दर्शकाला फटकारत आहे जो नेपोटिझम आणि स्टार किड्सच्या बाजूने बोलत आहे. काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुराना रिया चक्रवर्तीची बाजू घेऊन बोलताना दिला. यानंतर कंगनाचा रान अनावर झाला आहे. कंगना आयुष्मानला असं काही बोलली आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसेल. 

कंगनाने 'चापलूस आऊटसायडर्स' म्हणून आयुष्मानचा राग केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना नेपोटिझम आणि ग्रुपिझमवरून आरोप करत आहे. आता या अभिनेत्रीने आऊटसायडर्सवरच निशाणा साधला आहे. 

महेश भट्ट, करण जोहर, सलमान खान आणि आलिया भट्ट सह अनेक स्टार्सवर आरोप केले आहेत. तसंच आता तिने KRK चे ट्विट रीट्विट केले असून आयुष्मानवर निशाणा साधला आहे. 

कमाल आर खानने आयुष्मान खुरानाबाबत ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्याने आयुष्मानने म्हटलं की तीन कारणांमुळे तू नेपोटिझम आणि स्टार किड्सला सपोर्ट करत आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार ही आहेत तीन कारणं. १. आयुष्मानला बॉलिवूडमध्ये राहायचं आहे. २. तो यशराज फिल्म्समधील कलाकार आहे. ३. शेवटचं कारण म्हणजे तो सुशांतचा कॉम्पिटीटर होता. यानंतर केआरकेने लिहिलंय की, घाबरू नकोस. तुझी वेळ पण येणार आणि प्रेक्षक तुला उत्तर देणार. ऑल द बेस्ट

कंगानाने हे ट्विट रिट्विट करून लिहिलं आहे की, चापलूस आऊटसायडर्स फक्त एकाच कारणामुळे माफियांना सपोर्ट करतात. त्याच कारण आहे सामान्य विचार. त्याला इंडस्ट्रीमधून कुणीही धमकावत नाही. ही लोकंच कंगना आणि सुशांत सारख्या लोकांची मस्करी करतात. सत्य देखील सांगत नाहीत.