संजय राऊत खोट बोलतायत; सुशांतसिंह राजपूतच्या मामांचा खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी हे चुकीचे विधान केले. 

Updated: Aug 9, 2020, 10:34 PM IST
संजय राऊत खोट बोलतायत; सुशांतसिंह राजपूतच्या मामांचा खुलासा

पाटणा: सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याचे त्याच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध नव्हते. तसेच वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते, ही संजय राऊत यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्टीकरण सुशांत राजपूतच्या मामांनी दिले आहे. संजय राऊत यांनी रविवारी 'सामना'तील लेखात सुशांतच्या कुटुंबासंदर्भातील काही गोष्टींचा उल्लेख केला होता. मात्र, सुशांतचे मामा आर. सी सिंह यांनी राऊत यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन विवाह केलेले नसून संजय राऊत चुकीची माहिती देत असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर - संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी हे चुकीचे विधान केले. जेणेकरून आमची प्रतिमा डागाळेल. परंतु, हे करणे योग्य आहे का? सुशांतसिंह याच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे, हे बिहारमधील प्रत्येकाला माहिती असल्याचेही आर.सी. सिंह यांनी सांगितले. 

#SushantSinghRajput: 'आदित्य ठाकरेंचे हात कुठेतरी अडकलेत, ठाकरे कुटुंबाच्या बचावासाठी प्रयत्न'

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन सध्या महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी बिहार पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आले होते. मात्र, राज्य सरकारने बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाकारली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.