कंगना रानौतला जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीकडून तक्रार दाखल

 बॉलीवूड अभिनेत्री कंगना राानौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

Updated: Nov 30, 2021, 04:03 PM IST
कंगना रानौतला जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीकडून तक्रार दाखल

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राानौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिच्या एका वक्तव्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. खुद्द कंगनाने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. यासोबतच तिने एक लांबलचक नोटही लिहिली आहे. अभिनेत्रीने एफआयआरची प्रतही शेअर केली आहे.

कंगनाने स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सुवर्ण मंदिरात उभी असलेली दिसत आहे. यासोबतच तिने लिहिलंय की, 'मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचं स्मरण करत मी लिहितेय की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. या प्रकारात देशाच्या अंतर्गत गद्दारांचा हात आहे. अशा प्रकारची लांबलचक नोट कंगनाने शेअर करत ही माहिती दिली आहे. भटिंडाच्या एका व्यक्तीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगनाकडून एफआयआर दाखल 

अभिनेत्रीने लिहिलंय की, 'धमक्यांविरोधात मी पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. मला आशा आहे की पंजाब सरकारही लवकरच कारवाई करेल. माझ्यासाठी देश सर्वोत्कृष्ट आहे. त्यासाठी मला त्याग करावा लागला तरी चालेल. मला मान्य आहे. पण मी घाबरत नाही आणि कधी घाबरणार नाही, देशहितासाठी मी याविरोधात उघडपणे बोलत राहीन. देशद्रोही