भर स्टेजवर तो अचानक आला, आणि अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली

नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

Updated: Nov 30, 2021, 03:35 PM IST
 भर स्टेजवर तो अचानक आला, आणि अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली

मुंबई : कलाकार नेहमीच त्यांच्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. कधी त्याच्या पोस्टला चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. तर कधी ते ट्रोलिंगचा शिकार होताना दिसून येतात. 

तर मोठमोठ्या इव्हेटला देखील सेलिब्रिटी त्यांच्या लूक पासून ते वक्तव्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. असाच काहीसा किस्सा गौहर खानसोबत घडला होता. 

Why was Gauhar Khan slapped? | India.com

गौहर खान एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून पोहोचली होती, तेव्हा अचानक पब्लिक सीटवर बसलेला कोणीतरी आला आणि तिला कानशिलात लगावली. या अपघातानंतर गौहर खूप अस्वस्थ झाली. त्यातून बाहेर पडायला तिला खूप वेळ लागला

Disturbed Gauahar Khan on India's Raw Star after being slapped (see pics) |  Bollywood News – India TV

.

गौहर खानसोबत घडलेली ही घटना चांगलीच चर्चेत होती. काही वेळेस सेलिब्रिटी त्याच्या ड्रेसमुळे आणि स्टाईलिंगमुळे ही चर्चेत येतात. त्यांना फॉलो करणारे कॅमेरे आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ सगळ्यांचे लक्षवेधून घेतात.

Gauahar Khan slapped during India's Raw Star finale, celebs shocked -  Television News

अकिल मल्लिक नावाचा माणूस हा प्रेक्षकांमध्ये बसलेला होता. ग्रँड फिनालेमध्ये, त्याने सुरुवातीला गौहरवर मुस्लिम असूनही लहान कपडे परिधान केल्याचा आरोप केला, अश्लील टिप्पण्या केल्या आणि नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.