हृतिक रोशनची पोलिसात तक्रार, कंगना करायची सेक्शुअल मेल

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याने अभिनेत्री कंगना राणावतविरूद्ध तब्बल २९ पानांचे तक्रारपत्र पोलिसात  दाखल केले आहे. कंगना आपल्याला सेक्शुअल मेल करत होती, असा आरोपही हृतिकने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 3, 2017, 08:52 AM IST
हृतिक रोशनची पोलिसात तक्रार, कंगना करायची सेक्शुअल मेल title=

मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याने अभिनेत्री कंगना राणावतविरूद्ध तब्बल २९ पानांचे तक्रारपत्र पोलिसात  दाखल केले आहे. कंगना आपल्याला सेक्शुअल मेल करत होती, असा आरोपही हृतिकने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वीच एका टीव्ही चॅनल शोमध्ये अभिनेता हृतिक रोशनवर आरोपांची बरसात केली होती. दरम्यान, त्या वेळी हृतिकने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया व्यक्त केली नव्हती. मात्र, आता काही दिवसांनंतर मात्र हृतिकने कंगनाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. हे तक्रारपत्र तब्बल २९ पानांचे असून, यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. Republicworld.comच्या हवाल्याने जनसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिकने आपला फोन आणि लॅपटॉप पोलिसांकडे दिला आहे.

दरम्यान, हृतिकचे वकील महेश जेठमलानींद्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगना सातत्याने हृतिकचा पाटलाग करत होती. तसेच, तिने हृतिकला आपला इंटर्नल लव्हर म्हटले होते. तसेच, सभ्यता दाखवत हृतिकने कंगनाच्या मेलकडे दूर्लक्ष केल्याचेही जेठमलानी यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी कंगनावर सेक्शुअली इक्स्प्लिसिट मेल पाठवल्याचा आरोपही केला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x