कनिकाच्या कोरोनावर कुटुंबाचा धक्कादायक खुलासा

लखनऊमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.  

Updated: Apr 4, 2020, 08:14 AM IST
कनिकाच्या कोरोनावर कुटुंबाचा धक्कादायक खुलासा

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होतान पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या घषणेनंतर प्रत्येक जण स्वत:च्या घरात राहणं पसंत करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य जनते शिवाय मोठ्या कलाकारांना देखील कोरोनाची लागण झालेच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. त्यामुळे संपूर्ण कलाविश्वाकडून चिंता व्यक्त होताना दिसत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत कनिकाच्या कोरोनाच्या पाचही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या लखनऊमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं जात आहे. कनिका कपूर सध्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेजमध्ये आहे.

कनिकाची पाचवी चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं नसल्याचं सांगितले आहे. त्यानंतर आता कुटुंबीय  तिच्या साहव्या चाचणीची प्रतिक्षा करत आहेत, असं सांगण्यात येत आहे. 

शिवाय, रुग्णालयात तिच्या वागणुकीवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रुग्णालयात कनिकाला पडद्यांच्या आत कपडे बदलायला सांगितले होते, असं वक्तव्य तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.