राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या प्रेक्षकांना कलाकारांनीच चित्रपटगृहाबाहेर काढलं

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Oct 30, 2019, 08:09 AM IST
राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या प्रेक्षकांना कलाकारांनीच चित्रपटगृहाबाहेर काढलं  title=

मुंबई : बुधवारी बंगळुरू येथील मल्लेश्वरम ओरियन मॉलमधील पीव्हीआर थिएटरमधून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर सेलिब्रिटींची रोष ओढवला. या कुटुंबाला बाहेर काढण्यात येतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कन्नड अभिनेत्री, बी.व्ही. ऐश्वर्या हिने अभिनेता अरुण गौडा याच्यासोबतीने या प्रेक्षकांना बाहेर काढलं. अरुणने या प्रसंगाचा व्हिडिओही चित्रीत केला. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या या प्रेक्षकांची कानउघडणी करताना दिसत आहे. 'हे स्वत:ला भारतीय नागरिक म्हणवणारे, साधं राष्ट्रगीतच सुरु असताना उभं राहण्याचीही तसदी घेत नाहीत....', असं म्हणत या अशा प्रेक्षकांना या दोन्ही कलाकारांनी चांगलंच धारेवर धरलं. 

width: 640px; height: 598px;

चित्रपटगृहात सुरु असणाऱ्या या प्रकारामध्ये काही उपस्थिती प्रेक्षकांनीही या कुटुंबावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. ही सर्व मंडळी धनुषची भूमिका असणाऱ्या 'असूरन' हा चित्रपट पाहण्यासाठी आली होती. 

राष्ट्रगीत सुरु असताना त्यावेळी अवघ्या काही सेकंदांसाठीसुद्धा उभं राहू न शकणाऱ्या या प्रेक्षकांसोबतचा वाद इतका विकोपास गेला की, ऐश्वर्याने थेट त्यांना चित्रपटगृहातून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. याचविषयी माध्यमांना माहिती देत, राष्ट्रगीत सुरु असणाता मोबाईलचा वापर करणं, चित्रपटगृहात समोर पडद्यावर राष्ट्रध्वज दिसत असताना पाय वर करुन बसणं हा सर्व अपमानास्पद प्रकार खपवून घेतला जाणार नाही, या शब्दांत त्याची नाराजी व्यक्त केली.