close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टेलिव्हिजन अभिनेत्रीचं अपघाती निधन

आणखी चौघांचाही मृत्यू झाल्याचं वृत्त   

Updated: Jul 19, 2019, 07:49 AM IST
टेलिव्हिजन अभिनेत्रीचं अपघाती निधन

मुंबई : आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री शोभा यांचं बुधवारी अपघाती निधन झालं. टेलिव्हिजन विश्वातील कारकिर्दीसाठी त्या ओळखल्या जात होत्या. 'मगालू जानकी' या कार्यक्रमामुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. टेलिव्हिजन कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते टीएन सीताराम यांनी फेसबुक पोस्टद्वारे गुरुवारी ही दु:खद बातमी दिली. 

कन्नड भाषेत पोस्ट लिहित आणि शोभा यांचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी निधनाविषयी दु:ख व्यक्त केलं. संपूर्ण टीमच्या वतीने मी त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली देतो, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. 

'आयबी टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शोभा यांच्यासोबत यांच्यासोबत या अपघातात आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात ही दुर्घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये एकूण आठजण होते. ज्यापैकी पाचजणांना मृत घोषित करण्यात आलं, तर तिघंजण जखमी आहेत. बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथे असणाऱ्या बाणशंतरी मंदिरात जाण्यासाठी हे सर्वजण निघाल्याची माहिती आहे.