कपिल देव यांचं दीपिका पदुकोणविषयी मोठं वक्तव्य

 '८३' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

Updated: Dec 5, 2021, 05:06 PM IST
कपिल देव यांचं दीपिका पदुकोणविषयी मोठं वक्तव्य

मुंबई : कपिल देव फक्त त्यांच्या 1983 च्या विश्वचषक विजयी  आणि त्यांच्या प्रसिद्ध नटराज शॉटसाठी ओळखले जात नाहीत तर ते आपलं मत व्यक्त करण्यासाठी देखील ओळखले जातात. नुकताच '८३' च्या ऐतिहासिक विश्वचषकावर बनवलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याला सगळ्यांनीच चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे.

दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमीच्या भूमिकेत आहे. मात्र, ट्रेलरमध्ये दीपिकाची भूमिका फारशी दाखवलेली नाही. एका मुलाखतीमध्ये कपिल देव यांनी दीपिका पदुकोणची पत्नी रोमीची भूमिका साकारल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव म्हणाले: "फिल्मच्या ट्रेलरवर कुटुंबीयांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली कारण त्यांना माहित नाही की, त्यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा चित्रपटात किती साकारली गेली आहे. त्यामुळे तिला चित्रपटात काय करायचं आहे हे सांगणं कोणालाही कठीण आहे."

 कपिल देव यांनी रणवीर सिंगची जोरदार प्रशंसा केली आणि त्याला एक महान अभिनेता म्हटलं.रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची ही पहिलीच वेळ नाही आहे की, दोघं एकत्र काम करत आहेत. याआधीही दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या विश्वचषक विजयाभोवती फिरतो. रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषेत 24 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 3D मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.