तारक मेहतामधील सोनू आणि गोली यांच्यात नेमकं चाललंय तरी काय? पाहा व्हायरल फोटो

गेली अनेक वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Updated: Dec 5, 2021, 04:54 PM IST
तारक मेहतामधील सोनू आणि गोली यांच्यात नेमकं चाललंय तरी काय? पाहा व्हायरल फोटो

मुंबई : गेली अनेक वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जर तुम्ही देखील 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे चाहते असाल तर, आम्ही तुमच्यासाठी अशी बातमी घेवून आलो आहोत. जी शोच्या कथेची किंवा त्याच्या रिअल लाइफची नाही तर गोली म्हणजेच कुश शाह आणि जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली यांच्या खऱ्या आयुष्यातील फोटो आहेत. हा फोटो पाहून प्रत्येक चाहत्याच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

हातात झाडू आणि पुढे सोनू!
निधी भानुशालीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा जुना को-स्टार आणि टपू सेनेचा सदस्य गोली दिसतोय. इथे कुश शाहच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती आहे आणि त्याच्या हातात झाडू आहे. जो त्याने खांद्यावर ठेवला आहे. सोबत निधी मागून गळ्यात हात घालून उभी आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या
या फोटोवर कमेंट करत एका यूजरने लिहिलंय की, 'गोली बेटा मस्ती नाही'. दुसऱ्या युजरने लिहिलं की, 'टप्पू कुठेतरी कोपऱ्यात बसून रडत असेल'. तर दुसर्‍या एका यूजरने लिहिलंय की, 'टप्पू आता म्हणेल,' ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगा.' तर अजून एका यूजरने लिहिलंय की, 'ए गोळ्या, माझ्या सोनूपासून दूर राहा.' तर आणखी एका यूजरने लिहिलंय की, 'सोनू आणि गोली खूप दिवसांनी एकत्र.'