कॉमेडी किंग कपिल शर्माकडून चाहत्यांना ओपन चॅलेंज, फोटो शेअर करत म्हणाला ओळखा पाहू...

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतो.

Updated: Jul 16, 2021, 08:10 PM IST
कॉमेडी किंग कपिल शर्माकडून चाहत्यांना ओपन चॅलेंज, फोटो शेअर करत म्हणाला ओळखा पाहू... title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत राहतो. तो त्याच्या प्रत्येक एक्टिविटीची माहिती चाहत्यांसोबत शेअर करतो. आता  कपिल शर्माने आपला एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहत्यांसाठी त्याला ओळखणंही सोपं नाहीये. कपिल शर्माने चाहत्यांना या फोटोमध्ये त्याची ओळख पटावी आणि त्यांना सांगावं असं एक आवाहन दिलं आहे. कपिल शर्माने हा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर बर्‍याच प्रतिक्रियाही येत आहेत.

चाहत्यांना दिलं चॅलेंज
'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरू होण्यापूर्वी कपिल शर्माने चाहत्यांना त्याची ओळख पटवून कमेंट सेक्शनमध्ये सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे. या फोटोमध्ये कपिल निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे आणि त्याचबरोबर त्याने हातात डफलही पकडली आहे. त्याचा हा फोटो कॉलेजच्या काळातला दिसत आहे. फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, आपल्या मित्रांसह कॉमेडियन मजेच्या मूडमध्ये दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिल शर्माने स्वत:चे हे फोटो शेअर केले आणि लिहिलंय की, "नाटकाची तालीम संपल्यानंतर, माझ्या टीमबरोबर म्युझिक सेशन, मला या फोटोत शोधा? आणि खाली कमेंन्ट मध्ये कळवा.

'द कपिल शर्मा शो' लवकरच सुरू होणार आहे
लवकरच कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो व्यतिरिक्त कपिल शर्माने या वर्षाच्या सुरूवातीला आपला नेटफ्लिक्स प्रकल्पही जाहीर केला आहे.