Kapil Sharma च्या नावावर नवा रेकॉर्ड; सुपरस्टार Salman आणि Big B यांनी ही टाकलं मागे

  कपिल शर्माला आजच्या काळात कोण ओळखत नाही. कपिल शर्माने हे स्थान स्वबळावर मिळवले आहे.

Updated: Jan 19, 2022, 06:24 PM IST
Kapil Sharma च्या नावावर नवा रेकॉर्ड; सुपरस्टार Salman आणि Big B यांनी ही टाकलं मागे title=

मुंबई :  कपिल शर्माला आजच्या काळात कोण ओळखत नाही. कपिल शर्माने हे स्थान स्वबळावर मिळवले आहे. त्याच्या शोमध्ये येण्यासाठी अनेक सेलिब्रिटी वाट पाहतात. कोणत्याही सिनेमाचं प्रमोशन करायचं झालं की, सगळे सेलिब्रिटी वळतात ते कपील शर्माकडेच. आता कपिल शर्माने आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. ज्यामध्ये त्याने मोठ्या मोठ्या बॉलिवुड सेलिब्रिटिंना मागे टाकलं आहे.

वास्तविक, Ormax मीडियाने टॉप 5 'मोस्ट पॉप्युलर नॉन-फिक्शन पर्सनॅलिटी'ची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये कपिलने सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले आहे.

Ormax मीडियाने ही यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच ट्विट करून लिहिले आहे की, 'हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात प्रसिद्ध नॉन-फिक्शन व्यक्तिमत्त्व (डिसेंबर 2021)'

यामध्ये अशा व्यक्तीचं नाव असतं, ज्यांना हिंदी टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. या यादीनुसार कपिल शर्माने सलमान खानसह अमिताभ बच्चन यांना देखील मागे टाकले आहे.

त्याच वेळी, जर आपण ओरमॅक्स मीडियाच्या यादीबद्दल बोललो, तर कपिल शर्मा यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर सलमान खानला दुसरे स्थान मिळाले आहे आणि बिगबी म्हणजेच अमिताभ बच्चन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यासोबतच 'बिग बॉस 15' ची लोकप्रिय जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

टेलिव्हिजनच्या सर्व टॉप सेलेब्सला मागे टाकत कपिलने नवे स्थान मिळवले आहे.

ही यादी पाहून एका यूजरने कमेंट करत लिहिले की 'अरे देवा! द पॉवर कपल, तेजरन.' ही यादी पाहून या स्टार्सचे चाहते खूप खूश आहेत, तर अनेकजण या रेटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.