Kapil Sharma : कपिल शर्मा हा प्रसिद्ध कॉमेडियन आहे. कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या नव्या सीझनसह पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसह खाजगी जेटमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्याचबरोबर पत्नी गिन्नीसोबत स्टायलिश एन्ट्री मारताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला त्याने 'आओ हुजूर' असं कॅप्शन दिलं आहे.
कपिल शर्मा आणि गिन्नीच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भारती सिंग, अफसाना खान आणि करण टॅकरसह अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी देत त्याच कौतुक केलं आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी कधीच सोडत नाही. अनेकदा कौटुंबिक सुट्टीसाठी तो बाहेर जात असतो. शोचा पहिला सीझन संपल्यानंतर कपिल कॅनडाला सुट्टीसाठी गेला होता. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो देखील शेअर केले होते.
कपिल शर्माचे पुन्हा एकदा पुनरागमन
कपिल शर्मा हा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन सीझनसह परतण्याची तयारी करत आहे. त्याच्या शोचे देखील शुटिंग सुरु झाले आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या गृहिणी होत्या. टीमने नुकताच या शोचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये कपिलसह अर्चना पूरण सिंग, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि राजीव ठाकूर यांनी घोषणा केली आहे की, टीम लवकरच आणखी सेलिब्रिटी पाहुणे घेऊन मनोरंजनासह परत येईल.
कपिल शर्माचा चित्रपटांमध्ये दबदबा
कपिल शर्मा हा फक्त ओटीटी फ्लॅटफॉर्मवरच भरभराट करत नाही तर त्याचा सिनेमातही दबदबा आहे. 'क्र'मध्ये तब्बूच्या पतीच्या भूमिकेनंतर तो 'किस किसको प्यार करूं 2' मध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. कपिल शर्माने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किस किसको प्यार करूं' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. याच चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा कपिल त्याची भूमिका साकारणार आहे.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.