मुंबई : सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराईचे वातावरण आहे. एकामागून एक असे अनेक स्टार्स सप्तपदी घेत आहेत. नुकतंच आणखी एका अभिनेत्याचं लग्न झालं आहे. टीव्ही अभिनेता करण ग्रोव्हरने तिच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. या नवविवाहित जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोवर चाहते लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहे.
करण ग्रोवरचं लग्न
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोव्हरने त्याची गर्लफ्रेंड पॉपी जब्बलसोबत लग्न केलं आहे. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर करण आणि पॉपीने लग्नगाठ बांधली. चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांनी नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधलीये. दोघांचे हे लग्न हिमाचल प्रदेशात झालं.
लग्नाचे फोटो आले समोर
करण ग्रोव्हरनेही त्याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या दोघांनी गर्दी टाळण्यासाठी एका इंटिमेट सेरेमनीत लग्न केलं. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो पूर्णपणे रॉयल लूकमध्ये दिसत आहे. डोक्यावर पगडी आणि हातात तलवार घेऊन करण खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी पॉपी जब्बल देखील खूप सुंदर दिसत आहे. दोघांच्या वेडिंग आउटफिट एकमेकांना मॅचिंग होता.