Box Office : 'धडक' ची सर्वत्र धूम, 100 करोड क्लबमध्ये सहभाग

पाहा एवढी केली कमाई 

Box Office : 'धडक' ची सर्वत्र धूम, 100 करोड क्लबमध्ये सहभाग

मुंबई : जान्हवी कपूरचा डेब्यू सिनेमा 'धडक' प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले आहेत. या सिनेमात जान्हवीसोबत ईशान खत्तर आहे. या दोघांच्या अभिनयाचं कौतुक अनेकांनी केलं आहे. तसेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. धडक या सिनेमाने वर्ल्डवाइड आतापर्यंत 100 करोड रुपये कमाई केली आहे. धडकने 100 करोडच्या कल्बमध्ये एन्ट्री केली आहे. 

करण जोहरने या ट्विटमध्ये धडकने जगभरातील प्रेक्षकांच मन जिंकल आहे असं म्हटलंय. जगभरातून 100 करोडची कमाई केली आहे. नवीन चेहऱ्यासोबत या सिनेमाने खूप यश संपादन केलं आहे. जान्हवी आणि ईशान तुमचा अभिमान आहे. 

धडक या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतानने केलं आहे. धडक हा सिनेमा मराठीतील सुपरहिट सिनेमा सैराटचा रिमेक आहे. सैराट हा पहिला मराठी सिनेमा आहे ज्याने 100 करोडचं कलेक्शन केलं आहे.