अंगावर काटा आणणारा थरार आणि रोमान्स, 'Ajeeb Daastaans' दमदार ट्रेलर

'Ajeeb Daastaans' सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित       

Updated: Mar 20, 2021, 11:43 AM IST
अंगावर काटा आणणारा थरार आणि रोमान्स, 'Ajeeb Daastaans' दमदार ट्रेलर

मुंबई : मोठ्या कालावधी नंतर अखेर मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता धर्मा प्रॉडक्शनचा आगामी 'Ajeeb Daastaans' सिनेमाचा ट्रेलर  प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक करन जोहरने सिनेमाचा ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. महत्त्वाचं म्हणजे 'अजीब दास्तान' सिनेमा चार वेगळ्या कथांभोवती फिरणारा असून सिनेमा रूपेरी पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

करनने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये, 'अजीब दास्तान एक सहयोगी प्रयत्न आहे... ज्यामध्ये 4 हुशार व्यक्ती 4 वेगळ्या गोष्टी एकत्र करताना दिसणार आहेत.' तर आता सर्वांनाच सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमा  16 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. पाहा सिनेमाचा ट्रेलर....

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

'अजीब दास्तान' सिनेमात फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, नुसरत भरत, अभिषेक बनर्जी, इनायत वर्मा, कोंकणा सेन शर्मा, अदिती राव हैदरी, शेफाली शाह, मानव कौल आणि तोता रॉय चौधरी मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.