Anil Kapoor : 'या' अभिनेत्रीसाठी आपल्या बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर?

Anil Kapoor On Kangana Ranaut: आज ज्येष्ठ अभिनेते आणि सुपरस्टार अनिल कपूर (Anil Kapoor Birthday) यांचा 66 वा वाढदिवस आहे. तेव्हा आता सगळीकडेच अनिल कपूर यांचीच चर्चा आहे. त्यांच्या लाडक्या लेकीनं सोनम कपूरनं इन्टाग्रामवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Updated: Dec 24, 2022, 09:02 PM IST
Anil Kapoor : 'या' अभिनेत्रीसाठी आपल्या बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर?   title=
anil kapoor

Anil Kapoor On Kangana Ranaut: आज ज्येष्ठ अभिनेते आणि सुपरस्टार अनिल कपूर (Anil Kapoor Birthday) यांचा 66 वा वाढदिवस आहे. तेव्हा आता सगळीकडेच अनिल कपूर यांचीच चर्चा आहे. त्यांच्या लाडक्या लेकीनं सोनम कपूरनं इन्टाग्रामवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्याच सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आहेत. अनिल कपूर जितके लोकप्रिय आहेत तितक्याच्या त्यांच्या अनेक वादग्रस्त गोष्टीही चर्चेत राहिल्या आहेत. त्यांचा असा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  करण जोहरचा कॉफी विथ करण (coffee with Karan) हा शो कायमच वादग्रस्त आणि चर्चात्मक राहिला आहे. याच शोमध्ये अनिल कपूर यांनी आपल्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. त्यांना करण जोहरनं नेहमीप्रमाणे खाेचक प्रश्न विचारला होता आणि त्याचं त्यांनी दिलेलं उत्तर हे खूपच धक्कादायक होतं. ते तेव्हा काय नक्की म्हणाले होते, चला जाणून घेऊया. (karan johar show when anil kapoor sarcastically said he could leave his wife for kangana ranaut in coffee with karan)

आजकाल बॉलिवूड आणि वाद हे समीकरण समांतर रेषेप्रमाणे जात आहे. त्यात स्वरा भास्कर, कंगना राणावत, राखी सावंत अशा अनेक अभिनेत्री त्यांच्या मोठ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. सध्या अशीच एक अभिनेत्री जी कायम चर्चेत राहिली आहे तीच नावं आहे कंगना राणावत. ती कायमच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावरही तिची जोरदार चर्चा होत असते. परंतु तुम्हाला माहितीये का असेच एक अभिनेते कंगनाच्या प्रेमात पडले होते आणि त्यांचे नाव होतं अनिल कपूर. होय, वर म्हटल्याप्रमाणे करण जोहरच्या (KJo) अनिल कपूर यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तरही कंगना राणौतच होतं. तुम्ही हे वाचून कदाचित आश्चर्यचकित झाला असाल परंतु कंगना राणावतसाठी अनिल कपूर आपल्या बायकोलाही सोडायला तयार होते. 

बायकोला घटस्फोट? काय आहे कंगना कनेक्शन 

आपल्या बायकोला सोडून अनिल कपूर कंगना राणावतकडेही (Kangana Ranaut) जायला तयार होते, होय या प्रश्नावर अनिल कपूर यांनी उत्तर जरी दिलं असलं तरी यामागची गंमत वेगळी आहे. अनिल कपूर यांनी 2010 मध्ये करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हा खुलासा केला होता. जेव्हा करणने अनिलला एका महिलेचे नाव सांगण्यास सांगितले जिच्यासाठी ते आपल्या पत्नीला म्हणजे सुनीता कपूर यांनाही सोडून जाऊ शकतात. त्यावर अनिल यांनी गमतीनं कंगना राणावतकडे बोट दाखवत तिचे नाव घेतले होते. या एका गोष्टीनं सगळीकडेच खळबळ उडाली होती. 

अनिल कपूर हे आजही तेवढे फिट आहेत. ते एका मुलाखतीत म्हणाले होते की आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे. देवाच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित सुरू आहे. तुमच्यासाठी 24 तास आहेत तेव्हा त्यापैंकी तुम्ही एक तास स्वत:साठी किमान काढू शकता.