बॉलिवूडमधून मोठी बातमी । 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण

Karan Johar's 50th birthday bash becomes a super-spreader event : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे.  

Updated: Jun 5, 2022, 11:34 AM IST
बॉलिवूडमधून मोठी बातमी । 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण
Image Source : bollywoodlife

मुंबई : Karan Johar's 50th birthday bash becomes a super-spreader event : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. करण जोहर याच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 55 बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये हादरा बसला आहे.

या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यानंतर 1 जून रोजी कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या पार्टीतील अनेक सेलिब्रेटिना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. 

मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये करण जोहर याने त्याचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. हृतिक रोशन , शाहरुख खान , कतरिना कैफ , कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. 

 बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील करणच्या अनेक जवळच्या मित्रांना पार्टीनंतर कोविडची लागण झाली आहे. त्यांनी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले नसले तरी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, करण जोहरच्या पार्टीत नसलेला कार्तिक आर्यन यालाही कोरोनाची लागण  झाली आहे. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन या सेलिब्रिटींनी गेल्या काही आठवड्यांत त्यांना विषाणूचा संसर्ग झाल्याची घोषणा केली होती. विकी कौशललाही कोविड-19 ची लागण झाल्याचे बोलले जात आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x