Tejaswi Prakash आणि करण कुंद्राने मॉलमध्ये केलं Lip-lock, काही मिनिटांत Video Viral

लव्ह बर्डचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण आणि तेजस्वी लिफ्टमध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

Updated: Aug 28, 2022, 05:17 PM IST
Tejaswi Prakash आणि करण कुंद्राने मॉलमध्ये केलं Lip-lock, काही मिनिटांत Video Viral title=

Karan Kundra And Tejaswi Prakash Kiss Video Viral: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या लव्ह बर्ड्सची केमिस्ट्री पाहण्यासारखी असते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंग झालेत. असं असताना लव्ह बर्डचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण आणि तेजस्वी लिफ्टमध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत. या दोन स्टार्सचा हा लिप-किस व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एका मॉलच्या एक्सलेटवर उभे असल्याचं दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नारंगी रंगाच्या स्कर्टसोबत ब्रालेट घातला आहे. दुसरीकडे, करण कुंद्रा काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर तपकिरी रंगाचा कोट घातलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी दोघेही एक्सलेटरवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येताजाताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांसमोर येताच लिपकीस करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. यानंतर पापाराझींनी दोघांना व्हिडीओवर त्यांची प्रतिक्रिया विचारली. पापाराझींनी हे विचारताच करण आणि तेजस्वी आधी थोडे लाजले आणि नंतर हसायला लागले. यानंतर करण म्हणाला, 'बाकी ठीक आहे, फक्त दोघांच्या आईने हा व्हिडीओ पाहिला नाही.'