Kareena Kapoor Trolled: अभिनेत्री करीना कपूर ही आपल्या हटके स्टाईल्स ओळखली जाते. परंतु त्याहून करीना आपल्या अॅटिट्यूडसाठीही ओळखली जाते. सध्या करीनाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामुळे करीना ही चांगलीच ट्रोल झाली आहे. याप्रकारानं करीनाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सेलिब्रेटी अभिनेत्री या अनेकदा त्यांच्या विक्षिप्त फॅशनसाठी (Kareena Kapoor News) ओळखल्या जातात.
त्यामुळे त्या पुष्कळवेळा ट्रोलही होताना दिसतात परंतु अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या आपल्या विक्षिप्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. सध्या करीना ही एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. तिचा अॅटिट्यूड पाहून तिला प्रचंड प्रमाण ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी करीनाच्या उद्धटपणावर सगळेच भडकले आहेत.
यावेळी आपण करीनाच्या इन्टाग्रामवरून पाहिलेच असेल की ती ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती मोनॅकोलाला (Kareena Kapoor at Monacco) गेली होती. यावेळी ती मुंबईला परत आली आहे. त्यामुळे ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. परंतु यावेळी करीना अॅटिट्यूड मात्र खूप काही सांगून गेला. यावेळी नेटकरी मात्र तिच्यावर संतापले आहेत. तुमच्या टॅलेंट आहे परंतु काही वागण्यात नम्रता? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीनाला भेटण्यासाठी एअरपोर्टवर (Kareena Kapoor at Airport) एक फॅन तिच्या जवळ गेली. या एक महिला होत्या. त्या करीनासोबत आपला सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु त्या महिलेला करीनानं एग्नोर केलं आणि ती अशा अविर्भावात निघून गेली की हे पाहून चाहते प्रचंड भडकले.
हेही वाचा - गळ्यात माळ अन् टॅटू, शर्टलेस फोटोत खिलाडी कुमार पाहून चाहते गोंधळले
तिच्या या अॅटिट्यूटकडे पाहून एका युझरनं लिहिलंय की, ''पाहा तिच्या चालण्याच्या पद्धतीकडे... काहीच चेहऱ्यावर हास्य नाही, इतका गर्व की तिचा अहंकार तिच्या या देहबोलीतूनच दिसतो आहे. कोणत्या गोष्टीचा इतका अहंकार आहे?'' तर दुसऱ्या एका लिहिलंय की, ''हिला खूपच अहंकार आहे.'' तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''सर्वात उद्धट सेलिब्रेटी.''
तर एकानं लिहिलंय की, ''हे किती वाईट आहे, ही खूपच उद्धट वागते. एक सेल्फीचा तर प्रश्न होता. पण मला कळतं नाही की या सेलिब्रेटींना एवढा अहंकार असतो तरी का? म्हणूनच मला ते कधीच आवडत नाहीत. हे फक्त चित्रपटांमध्ये चांगले दिसतात. पण वास्तव पाहा.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''करीना तू चाहत्यांशिवाय काहीही नाहीस.'' तर एकानं लिहिलंय की, ''तिचा हा अहंकार तिला एक दिवस जमिनीवर आणेल.''