मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांचं हेल्थ बुलेटिन वेळोवेळी जारी केलं जात आहे. बीएमसीने करीना कपूरचं घर सील केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, करीना कपूरने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं नाही.
तिने आपल्या मैत्रिणींसोबत जोरदार पार्टी केली आणि मास्क घातला नाही. रिपोर्ट्सनुसार, ही पार्टी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी झाली. त्यानंतर संजय कपूरची पत्नी महीप कपूरचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर सोहेल खानची पत्नी सीमा खान देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.
Kareena has tested positive for Covid.
Get well soon Beboo pic.twitter.com/cfEqYUGDP2— Kareena Kapoor Khan (@KareenaK_FC) December 13, 2021
याबाबत बोलताना करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी सांगितलं की, करीनाची तब्येत ठीक वाटत नाही. तिला ताप आणि अंगदुखी वाटत होती. यानंतर करिनाने कोविड चाचणी करण्याचा विचार केला. जो रिपोर्ट पॉझिटीव्ह आला
रणधीर कपूर यांनी सांगितलं की, मुलंही करीना कपूरसोबत आइसोलेट आहेत. त्यांनी घरीच राहवं असा सल्ला डॉक्टरांनी तिला दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करीना अनेक पार्ट्यांमध्ये स्पॉट झाली होती. ज्यामध्ये तिच्यासोबत मलायका अरोरा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, रिया कपूरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.