आन्टी बोलल्यावर भडकली करिना कपूर

सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अभिनेत्री करिना कपूरला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले.

Updated: Mar 9, 2019, 06:56 PM IST
आन्टी बोलल्यावर भडकली करिना कपूर title=

मुंबई : सोशल मीडियावर सेलेब्रिटींना नेहमीच ट्रोल केले जाते. सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अभिनेत्री करिना कपूरला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. सोशल मीडियावर करिनाला एका चाहत्याने आन्टी म्हणून हाक मारली आहे. अरबाज खानने त्याच्या 'पिंच' शोचा टी़जर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Watch my new show Quick Heal - PinchbyArbaazKhan that will air on the 12th of March only on QuPLAYTV. Here’s a sneak peek of what you can expect. http://y2u.be/4h0wVmTgP3M

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

 

लवकरच अरबाज त्याचा हा शो प्रदर्शित करणार आहे. दोन मिनीटांच्या या व्हिडिओमध्ये अरबाजने करिनाला एक कमेंट मध्ये दाखवले ज्यामध्ये नेटकऱ्याने तिला ट्रोल केले आहे, तो म्हणाला, 'तू आता काकू झाली आहेस, एका तरूण मुली सारखं वागणं बंद कर' त्यामुळे ती नाजार झाल्याचे दिसत आहे. एका वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, करण जौहर, सोनम कपूर आहूजा आणि कपिल शर्मा हे कलाकार अरबाज खानसोबत या शोमध्ये गप्पा मारताना दिसणार आहे. 

सध्या करिना तिच्या 'गूड न्यूज' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा व्हिडीओ अरबाज खानच्या बहुप्रतिक्षीत शोचा टी़जर आहे. या शोचे नाव 'पिंच' असे आहे. या चॅट शोच्या माध्यमातून सेलिब्रिटी नेटकऱ्यांना चांगलेच उत्तर देताना दिसणार आहेत.